इचलकरंजी शहरातील विविध भागातील ओपन बारवर (Open bar) पोलिस उपअधिक्षक बी. बी. महामुनी आणि गावभाग पोलिसांच्या पथकाने केलेल्या कारवाईत करत 19 मद्यपींना अटक केली. या कारवाईत एक चारचाकी, 8 दुचाकी व अन्य साहित्य असा 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे तळीरामांच्यात खळबळ उडाली आहे.
___________________________
Must Read
1) अभिनेता स्वप्नील जोशीचं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक
3) हरभजनने केली कोरोना लसीची मस्करी, IPS अधिकाऱ्याने सुनावलं
4) PUBG Mobile India भारतात लॉन्च होणार का नाही? कंपनीने दिलं उत्तर
5) विराटच्या सहाय्यकाचे अखेर विलगीकरण संपले
6) लॉकडाऊनमध्ये सेक्स टॉईजचा बाजार वाढला...हे शहर आघाडीवर...
_____________________________
शहरातील अनेक रिकाम्या जागा या मद्यपींची ठिकाणे बनल्याने तसेच अनेक भागात शितपेय विक्री, चिकन 65 च्या गाड्यांवर मद्यपान केले जात असल्याच्या तक्रारी येत होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने गुरुवारी रात्री त्या अनुशंगाने पोलीस उपअधिक्षक बापुराव महामुनी यांच्या पथकासह गावभागचे सपोनि गजेंद्र लोहार यांच्या पथकाने तात्यासो मुसळे हायस्कूल परिसर, वडगांव बाजार समिती व आरगे भवन परिसर या भागात संयुक्त कारवाई केली. त्यावेळी अनेकजण मद्यपान करताना रंगेहात सापडले.
मुसळे हायस्कूल रोड परिसरात केलेल्या कारवाईत बाप्पा मारुती देडे (वय 35) व तानाजी शहाजी चव्हाण (वय 26 दोघे रा. साईट नं. 102) हे उघड्यावरच मद्यपान करत असताना मिळून आले. या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 50 रुपयांची विदेशी दारुची बाटली व 35 हजार रुपये किंमतीची होन्डा शाईन मोटरसायकल ( क्र. एमएच 09 डीबी 4249) असा 35 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोकॉ राम सुर्यकांत पाटील यांनी फिर्याद दिली आहे.
वडगाव बाजार समिती परिसरातील उघड्या जागेवर दारू पिण्यासाठी बसलेल्या 10 जणांना ताब्यात घेतले. त्यामध्ये महमंद मेहबुबखाण पठाण (वय 23, रा. आसरानगर), विकास अनिल कुर्हाडे (वय 24, रा. नेहरुनगर), शिवाजी यशंवत पोवार (वय 41, रा. सुतारमळा), भारत विजय राटवळ (वय 22, रा. लालनगर), प्रमोद महादेव जावीर (वय 21, रा. कारंडे मळा, शहापूर ), विनायक सावता भिसे (वय 30, कोेल्हापुर नाका), प्रमोद बाळगोंडा पाटील ( वय 34, रा. टाकवडे वेस), शुभम सोपान वळे (वय 23, कारंडे मळा, शहापुर), रफीक बादशाह सदलगे (वय 38, रा. नेहरुनगर) आणि बसवराज शंकर आदीमणी (वय 30, रा. नेहरुनगर) यांचा समावेश आहे. या कारवाईत बिअरच्या बाटल्या आणि 6 मोटरसायकली असा 1 लाख 80 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरगे भवनजवळील मोकळ्या मैदानात मद्यपान करतबसलेल्या नितीन नागाप्पा सुर्वे (वय 39, रा. लाखेनगर), महेश विठ्ठल लाखे (वय 32, रा. लाखेनगर), गणेश मारुती पाटोळे (वय 25, रा. कांबुरे गल्ली, विक्रमनगर), तेजस कैलस मिणेकर (वय 30, रा. विक्रमनगर), फिरोज बाबासाहेब जमादार (वय 25, रा. सुतारमळा), जुबेर नजीर सय्यद (वय 21, रा. सुतारमळा) या सहाजणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून 1 मोेटरसायकल, शेवरलेट कंपनींची तवेरा (क्र. एमएच 05 एजे 5918) असा 2 लाख 80 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी राबवलेल्या या धडक कारवाईमुळे तळीरामांच्यात खळबळ उडाली तरी नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.