
(Teacher's Corona Test) कोरोना संसर्गामुळे (Coronavirus) राज्यातील शाळा मार्च महिन्यापासून बंद आहे. मात्र, आता कोरोना संसर्ग बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. त्याचबरोबर नवे रुग्ण देखील कमी आढळून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर नाशिकचे (Nashik) पालकमंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal)यांनी येत्या 4 जानेवारीपासून नाशिक जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
इयत्ता 9 वी ते 12 वीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहे. मुंबई, पुण्याच्या नियोजनाचा अभ्यास करून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.पालकमंत्री छगन भुजबळांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक झाली. या बैठकीत कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन 4 जानेवारीपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
-------------------------------------------------
Must Read
1) ग्रामपंचायत बिनविरोध करा अन् पंचवीस लाख रूपये मिळवा! आमदारांची ऑफर
2) मोठी घडामोड, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट पत्र
3) रस्त्यात गाडी थांबवून शरद पवारांनी दिले आशीर्वाद
4) ब्लॅकमेल करत तब्बल 21 वर्षे केलं लैंगिक शोषण आणि त्यानंतर...
5) MIM च्या नेत्याने तिघांना घातल्या गोळ्या VIDEO
--------------------------------------------------------
नाशिकमधील कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण (Teacher's Corona Test) कमी झाले आहेत. ही समाधानकारक बाब आहे. दूसरी लाट येण्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज ठेवण्यात आलं आहे.नाशिक जिल्ह्यात 13 हजार शिक्षक आहेत. 4 जानेवारीपूर्वी सर्व शिक्षकांची पुन्हा कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे. लसीकरणाबाबत जिल्हा प्रशासनाचं नियोजन पूर्ण झालं आहे. जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात लस उपलब्ध होईल, असा अंदाज असल्याचं पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. लस देण्यासाठी जिल्ह्यात 650 बूथ तयार करण्यात येणार आहेत. एका बूथवर दिवसाला 100 जणांना लस देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितलं की, लसीकरणासाठी 667 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. 30000 हेल्थ वर्कर्सला पहिल्या टप्प्यात लस दिली जाणार आहे. महिन्याभरात लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. चार प्रकारचे कोरोना व्हॅक्सिन उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
महाविकास आघाडीत नाराजी नाही..
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं. त्यावर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ म्हणाले की, महाविकास आघाडीत नाराजी नाही. फक्त सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सुद्धा मुख्यमंत्र्यांना सूचना देत असतात. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकत्र लढण्याचं विचार सुरू आहे. तिन्ही पक्षप्रमुखांमध्ये याबाबत चर्चा सुरू असल्याचंही भुजबळांनी यावेळी सांगितलं.