_______________________
Must Read
1) मराठा आरक्षण : वकिलांची समन्वय समिती जाहीर
2) चर्चेची पाचवी फेरीही निष्फळ ठरल्याने शेतकरी संतापले
3) प्रमुख धर्मस्थळे, महत्त्वाच्या ठिकाणी बंदाेबस्तात वाढ, ६ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खबरदारी
4) वनडेचा ‘डॉन’ बनण्याकडे विराटची वाटचाल
5) रिंकू राजगुरूच्या चाहत्यांसाठी खुशखबर! दिसणार या हिंदी चित्रपटात
6) संजय राऊत यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
______________________________
चहलने दुसऱ्या टी-20 सामन्यात चार ओव्हर्समध्ये 51 धावा देत एक विकेट घेतला आहे. चहलने घातक दिसणाऱ्या स्टिव स्मिथला आउट करत टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात आपले 59 विकेट्स पूर्ण केले आहेत. त्याने 44 सामन्यांमध्ये हा रेकॉर्ड केला आहे. तसेच टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने 50 सामन्यांमध्ये 59 विकेट्स घेतले आहेत. चहल आणि बुमराह दोघेही भारतीय संघाचे स्टार गोलंदाज आहेत. जे अत्यंत अटीतटीच्या वेळी भारतीय संघासाठी गेम चेंजर ठरतात.
या यादीत भारताचा ऑफ स्पिनर गोलंदाज रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) 52 विकेट्ससह तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच्यानंतर भुवनेश्वर कुमार 41, कुलदीप यादव 39 आणि रविंद्र जाडेजा 39 वर आहे. तसेच टी-20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याबाबत बोलायचे झाले तर हा रेकॉर्ड श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लथिस मलिंगाच्या नावावर आहे. मलिंगाने 84 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 107 विकेट्स घेतले आहेत.
चहलने याआधी कॅनबरामध्ये मनुका ओवलमध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात 25 धावा देत तीन विकेट्स घेतले होते. चहलला त्याच्या शानदार खेळीसाठी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्काराने सन्मानिक करण्यात आलं होतं. दरम्यान, भारत दुसरा टी-20 सामन्यात 6 व िकेट्स घेत विजय मिळवला आणि त्याचसोबत तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 अशी आघाडी घेत मालिका जिंकली आहे.