chandrakant patilpolitics news of maharashtra- “चंद्रकांत पाटील हे चंपारण्यातील एक पात्र आहेत. ते नेहमीच भ्रमण करत असतात. त्यांच्या सोयीच्या ठिकाणी ते थांबतात,” अशी खोचक टीका मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर केली.त्यांनी चंद्रकांत पाटील (chandrakant patil) तसेच भाजपला चांगलंच घेरलं. 

चंद्रकांत पाटील पुण्यातील अटल संस्कृती गौरव पुरस्काराच्या वितरण सोहळ्यात शुक्रवारी (25 डिसेंबर) बोलत होते. यावेळी बोलताना ‘पुण्यात प्रत्येकाला सेटल व्हावंसं वाटतं. पण देवेंद्र मी तुम्हाला सांगतो, मी कोल्हापूरला परत जाणार आहे. विशेषत: मला विरोधकांना ही गोष्ट सांगायची आहे,’ असे वक्तव्य त्यांनी केलं. 

त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय (politics) गोटात चांगल्याच प्रतिक्रिया उमटल्या. पाटलांच्या याच वक्तव्यावर बोलताना “चंपारण्यात एक पात्र आहे. हे पात्र नेहमी भ्रमण करतं त्यांच्या सोयीच्या ठिकाणी ते थांबत आणि गैरसोय झाली की हे पात्र बदलतं. या पात्रामध्ये चंद्रकांत पाटील असावेत,” असे म्हणत वडेट्टीवार यांनी पाटलांवर खोचक टीका केली. (politics news of maharashtra)

-----------------------------------

Must Read

1) इचलकरंजीत जानेवारीमध्ये कोरोना लसीकरणाचे नियोजन

2) मी मात्र कोल्हापूरला परत जाणार' : चंद्रकांत पाटला

3) राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांना फोनवरून दिली धमकी

4) सरकारी नोकरीत अव्वल स्थानी असणारे भारताचे 7 स्टार क्रिकेटपटू

-----------------------------------

मतदारसंघ बदलल्याने चंद्रकांत पाटलांवर टीका

राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीत चंद्रकांत पाटलांनी आपल्या कोल्हापूर मतदारसंघाऐवजी पुण्यातील कोथरुड येथून निवडणूक लढवली. कोथरुड येथून ते नवडूनही आले. मात्र, हाच विषय चंद्रकांत पाटलांना नेहमीच आडचणीचा ठरलेला आहे. मतदारसंघ बदलल्यामुळे सोयीच्या मतदारसंघातून निवडणूक लढवल्याचा आरोप त्यांच्यावर विरोधकांकडून केला जातो. त्यावर त्यांनी वेळोवेळी स्पष्टीकरणही दिलेलं आहे. पुण्यातील कार्यक्रमात बोलताना त्यांनी याच विषयाला हात घातला आणि कोल्हापुरातूनही निवडून येण्याची क्षमता असल्याचा दावा केला. त्यांच्या याच दाव्यामुळे चंद्रकांत पाटलांवर (chandrakant patil) विरोधकांनी टीका केली आहे.