इचलकरंजी शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या  (City Traffic Control Branch) वतीने शहरातील विनानंबर प्लेट (whitout number plate) आणि फॅन्सी नंबर प्लेट वाहनांच्या विरोधात धडक मोहिम सुरू केली आहे. त्या अंतर्गत दोन दिवसात केलेल्या कारवाईत 56 वाहने जप्त करून 11 हजार 600 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे, अशी माहिती वाहतूक नियंत्रण शाखेचे सपोनि नंदकुमार मोरे यांनी दिली.

___________________________

Must Read

1) अभिनेता स्वप्नील जोशीचं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक

2) HDFC बँकेला मोठा झटका!

3) हरभजनने केली कोरोना लसीची मस्करी, IPS अधिकाऱ्याने सुनावलं

4) PUBG Mobile India भारतात लॉन्च होणार का नाही? कंपनीने दिलं उत्तर

5) विराटच्या सहाय्यकाचे अखेर विलगीकरण संपले

6) लॉकडाऊनमध्ये सेक्स टॉईजचा बाजार वाढला...हे शहर आघाडीवर...

_____________________________

शहर व परिसरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्‍वभूमीवर अप्पर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड यांनी नंबरप्लेट नसलेल्या आणि फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या वाहनांच्या विरोधात कारवाई करण्याच्या सुचना केल्या आहेत. त्यानुसार वाहतूक पोलिसांनी शहरातील मुख्य चौकासह  शहराला जोडणार्‍या मार्गावर विनानंबर प्लेट आणि फॅन्सी नंबर प्लेट  वाहनांच्या विरोधात धडक मोहिम सुरू केली आहे. दोन दिवसांपासून वाहनधारकांकडे वाहन परवाना, विमा, वाहन मालक आदी कागदपात्रांची तपासणी सुरू करून नंबर प्लेट नसलेली 56 वाहने जप्त केली आहेत. या कारवाईत 11 हजार 600 रुपये इतका दंडही वसुल केला आहे.. दंड वसुल केला जात असला तरी त्या वाहनांना नंबर प्लेट लावल्यानंतरच सोडले जात आहे.