youtubeव्हिडिओ शेअरींग (video sharing) प्लॅटफॉर्म म्हणून लोकप्रिय असलेल्या यूट्यूबच्या व्हिडिओ क्रिएटर्ससाठी 'बॅड न्यूज' असून यूट्यूबकडून याआधी व्हिडिओ शेअर करणाऱ्या क्रिएटर्सना पैसे मिळत होते. ज्या क्रिएटर्सच्या व्हिडिओवर यूट्यूबकडून (youtube) जाहिरात दाखवली जाते, त्यांनाही जाहिरातीतून मिळणाऱ्या रक्कमेतील हिस्सा मिळतो. पण, यूट्यूबच्या पॉलिसीमध्ये आता एक मोठा बदल झाला असून अनेक क्रिएटर्सच्या व्हिडिओवर जाहिराती दाखवल्यानंतरही त्यांना पैसे मिळणार नाहीत.

Must Read

1) SBI च्या ग्राहकांसाठी नवी सुविधा, चेकबुकसाठी बँक देत आहे ही खास सेवा

2) "ठाकरे कुटुंबाचा व्यवसाय आहे तरी कोणता?

3) तिसऱ्यांदा 'बाबा' झाला RCBचा हा स्टार क्रिकेटपटू, PHOTO शेअर करत दिली गोड बातमी

4) भाजप आमदार प्रसाद लाड यांना कोरोनाची लागण

5) दिवसभराची झोप पूर्ण होऊनही थकवा का जाणवतो?

युट्यूबच्या (youtube) नवीन मॉनिटाइजेशन नियमांनुसार, क्रिएटर यूट्यूबच्या पार्टनर प्रोग्रामचा जर भाग नसेल तरीही त्याच्या व्हिडिओवर जाहिराती दाखवता येतील. यूट्यूबकडून प्लॅटफॉर्मच्या अटी अपडेट करण्यात आल्या आहेत. कोणत्याही यूट्यूब व्हिडिओवर (video sharing) आतापर्यंत जाहिराती दिसायच्या आणि क्रिएटरला त्या बदल्यात पैसे दिले जात होते. पण यापुढे असे होणार नाही. म्हणजे आता एखाद्या व्हिडिओवर जाहिरात दिसली तरी त्याचे पैसे क्रिएटरला मिळतीलच असे नाही.

अनेक छोट्या क्रिएटर्सना नवीन अपडेटचा फटका बसू शकतो. एखाद्या क्रिएटरचे किमान 1000 सबस्क्राइबर्स यूट्यूब पार्टनर प्रोग्रामचा भाग बनण्यासाठी असायला हवेत, तसेच 12 महिन्यांच्या आत 4000 तासांचा वॉचटाइम त्यांच्या व्हिडिओला असणे गरजेचे आहे. अमेरिकेत कंपनीने नवीन 'टर्म्स ऑफ सर्व्हिसेस' रोलआउट केले आहेत, पण जगभरातील अन्य मार्केट्समध्येही पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत या अटी लागू होतील.

आम्ही YPP अर्थात यूट्यूब पार्टनर प्रोग्रामचा भाग नसलेल्या चॅनल्सच्या व्हिडिओंवरही टप्प्याटप्प्याने जाहिराती दाखवू, म्हणजे YPP चा हिस्सा तुम्ही नसाल तरीही तुमच्या व्हिडिओंवर जाहिराती दिसू शकतात, असे युट्यूबकडून सांगण्यात आले आहे. यूट्यूब पार्टनर प्रोग्रामचा भाग नसल्यामुळे जोपर्यंत क्रिएटर्स आपले चॅनल मॉनिटाइज करत नाही, तोपर्यंत त्यांना कोणतेही पैसे मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.