suicide case


crime news-  kolhapur महापालिकेत नोकरी लावण्याच्या अमिषाने दिलेले पैसे परत मिळत नसल्याच्या नैराश्‍येतून तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. तुषार उदय रोडे (वय 28, रा. मंडलिक गल्ली, मंगळवार पेठ) असे त्यांचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी (suicide) त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीतून या प्रकरणाचा उलगडा झाला. याप्रकरणी संशयित महिलेला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. सुलोचना वसंत सावंत (वय 54) असे तिचे नाव आहे.

तुषार रोडे हे मंडलिक गल्लीत कुटुंबासोबत राहत होते. त्याच्या वडीलांची गिरण आहे. सध्या ते हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत होते. त्यांनी चहाची एजन्सीही सुरू केली होती. पण लॉकडाऊन काळात ती बंद केली. ते वरचेवर मोबाईल घेऊन टेरेसवर जात होता. गुरूवारी सायंकाळी ते मोबाईल घेऊन टेरेसवर गेले. येथील पत्र्याला दोरीने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. ते बराच वेळ खाली आला नाही, म्हणून घरची मंडळी त्याला बोलवण्यासाठी टेरेसवर गेली. त्यावेळी त्यांना ही घटना निदर्शनास आली.

Must Read

1) मोदी सरकारची लाखो लोकांना दिवाळीची भेट

2) कोरोनामुळे भाजप आमदाराचा मृत्यू

3) तुमचा गॉडफादर कोण ? दानवेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

4) ...म्हणून राज ठाकरेंनी तिघींचं केलं कौतुक

5) Covid 19 : भारतात वॅक्सिनची गरज लागणार नाही, AIIMS ने दिले संकेत

त्यांनी याची माहिती जुना राजवाडा पोलिसांना दिली. तसे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तेथे त्यांना तुषार यांनी लिहलेली एक चिठ्ठी सापडली. संशयित सुलोचना सावंत नावाच्या महिलेला जबाबदार धरा असा मजकूर होता. मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआरमध्ये नेण्यात आला. तेथे नातेवाईकांनी संबधितावर कारवाई झालीच पाहीजे असा पवित्रा घेतला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने कारवाईस सुरवात केली. 

रोडे कुटुंबीयांची गिरण आहे. या कुुटुंबाशी संशयित सुलोचना सावंत या महिलेची ओळख आहे. ती महापालिका आरोग्य विभागात काम करत असून सध्या तिची नेमणूक सावित्रीबाई रुग्णालयात आहे. तिने तुषार यांना महापालिकेत नोकरी लावतो असे सांगितले होते. त्यासाठी रोडे कुटुंबाने तिला 2017 मध्ये आठ लाख रूपये दिले होते. त्यातील काही रक्कम तिने दिली. पण उर्वरित रक्कम तिच्याकडून मिळत नव्हती. अशी माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आली.

याबाबत तुषार यांचे वडील उदय रोडे यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संशयित सावंत हिच्या विरोधात फसवणूक व मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तिला आज सकाळी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला दोन दिवसाची कोठडी सुनावली. याबाबत अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखील उपनिरीक्षक अंजना फाळके करीत आहेत. सावंत हिच्यावर नोकरीच्या अमिषाने फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे. त्याचीही खातरजमा करण्याचे काम पोलिस करीत आहेत. 

माझ्या मृत्यूस हिच जबाबदार... 

आत्महत्येपूर्वी (suicide) तुषार रोडे यांनी लिहलेल्या चिठ्ठीत महापालिकेत नोकरीत लावतो म्हणून 2017 मध्ये आठ लाख रूपये घेतले आहेत. त्यातील थोडे पैसे परत मिळाले मात्र उर्वरित रक्कम मिळालेली नाही. माझ्या मृत्यूस सुलोचना सावंत हिच जबाबदार आहे. असा आशयाचा मजकूर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.