music video honey singhmusic video- हनी सिंग हे नाव कोणत्याही व्यक्तीला नवीन नाही. तरुणाईमध्ये हनी सिंगच्या गाण्याची तुफान क्रेझ आहे. त्यामुळे त्याचं कोणतंही गाणं प्रदर्शित झालं की ते अल्पावधीत लोकप्रिय होतं. अलिकडेच त्याचं ‘फर्स्ट किस’ हे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. पार्टी साँग असलेलं हे गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान गाजत आहे.

Must Read

1) रोहित पवारांना मिळणार मोठी जबाबदारी?

2) अवघ्या १ रुपयांत खरेदी करा सोनं ! PhonePe ची ऑफर

3) ऑनलाईन काम देण्याच्या नावाखाली घरी बोलावून इंजिनिअर मुलीवर बलात्कार

4) "शरद पवार अजितदादांना नाही सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करतील”

5) त्या आजाराने गेला असता बाहुबलीच्या भल्लालदेवचा जीव


या गाण्यात हनी सिंगसोबत इप्सिता झळकली असून हनी सिंगने हे गाणं स्वरबद्ध केलं आहे. तर लीली गोली, होमी दिल्लीवाला, सिंघस्टा व हनी सिंग यांनी मिळून हे गाणं लिहिलं आहे. विशेष म्हणजे या गाण्यात अभिनेत्री अनुष्का शर्मा – विराट कोहली (virat kohli) यांच्या नावाचादेखील उल्लेख करण्यात आला आहे.


दरम्यान, यापूर्वी हनी सिंगचं केअर नी करद हे गाणं (music video) प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. छलांग या चित्रपटात हे गाणं पाहायला मिळालं होतं.