technology-whatsapp featurestechnology-  व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सना (whatsapp users)लवकरच व्हिडीओसाठी नवीन फीचर मिळणार आहे. या फीचर्सच्या मदतीने, युजर्स व्हिडिओ पाठविण्यापूर्वी तो म्यूट करू शकतील. फीचर (whatsapp features)स्टेटस लागू करताना देखील हे कार्य करेल.

व्हॉट्सअ‍ॅपशी संबंधित तपशील प्रदान करणार्‍या WABetaInfo च्या मते, कंपनी आता एक म्यूट व्हिडिओ फीचर डेवलप करीत आहे. बीटा अपडेटमध्ये नवीन फीचर दिसणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपने नुकतेच युजर्ससाठी डिसअपीयरिंग, ऑलवेज म्यूट, व्हॉट्सअ‍ॅप पे यासारखे फीचर्सही (whatsapp features) आणली आहेत.

अशा प्रकारे कार्य करेल म्यूट फीचर

कंपनीने अद्याप या फीचरशी संबंधित कोणतीही माहिती शेअर केलेली नाही, परंतु WABetaInfoने त्यास संलग्न असलेला स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यामध्ये वीडियो लेंथच्या तळाशी व्हॉल्यूम चिन्ह दिसत आहे. त्यावर टॅब करून, आपण व्हॉल्यूम कमी करण्यास किंवा म्यूट करण्यात सक्षम व्हाल. तसेच, आपण स्टेटस वर व्हिडिओ सेट करता तेव्हा आपण तो त्याच प्रकारे म्यूट करू शकता.

Must Read

1) कोरोनापेक्षाही भयंकर आहे Chapre Virus, साध्या तापानं होतोय रुग्णांचा मृत्यू; 'ही' आहेत लक्षणं

2) Breaking News! दोन शिफ्टमध्ये भरतील शाळा

3) देवेंद्र फडणवीसांवर काँग्रेसचा जोरदार पलटवार, बाळासाहेब थोरात

4) भाजप खासदार रक्षा खडसे आणि चंद्रकांत पाटलांमध्ये जुंपली

5) साडीत खुललं रिंकू राजगुरूचं रुप; PHOTO पाहून चाहते सैराट