whatsapp featurestechnology- व्हॉट्सअॅप युजर्ससाठी (whatsapp user) एक खूशखबर आहे. कंपनीने नेहमीप्रमाणे अॅप अपग्रेड केलं असून यामध्ये नव्या ६१ वॉलपेपर्सचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे युजर्सना चॅटिंग करताना वेगळाच अनुभव मिळू शकतो. व्हॉट्सअॅपनं (whatsapp features)सध्या आपल्या बीटा युजर्ससाठी हे वॉलपेपर आणलं आहे.

व्हॉट्सअॅप बीटा इन्फोने याबाबत माहिती देताना म्हटलं की, “व्हॉट्सअॅपने आपल्या अँड्रॉईड बीटा युजर्ससाठी अॅडव्हान्स्ड वॉलपेपर नावाचं फीचर लॉन्च केलं आहे. युजर्स आपल्याला आवडेल अशा पद्धतीनं चॅटिंगच्या बॅकग्राउंडचं वॉलपेपर बदलू शकतात. आता यासाठी त्यांना ६१ नव्या वॉलपेपर्सचे पर्याय मिळू शकतील.

Must Read

1) आता सोने खरेदी करताना व्हा स्मार्ट! नेमके कोणते अतिरिक्त दर लागतात घ्या जाणून

2) कारागृहाबाहेर नवनीत राणा यांचे धरणे आंदोलन

3) मंदिर खुली होणार असली तरी 'हे' नियम पाळावे लागणार!

4) बॉलिवूडच्या बाजीराव-मस्तानीच्या लग्नाला 2 वर्ष पूर्ण; पोस्ट शेअर

5) किरीट सोमय्या यांना मदत करायला तयार आहोत - आज्ञा नाईक

6) PHOTOS: रिंकू राजगुरूच्या नव्या फोटोंनी चाहत्यांना पाडली भुरळ

ट्वीटसोबत व्हॉट्सअॅप बीटा इन्फोने वॉलपेपर्सच्या डिझाईनची यादी देखील प्रसिद्ध केली आहे. याद्वारे नवे वॉलपेपर कसे दिसतात हे पाहता (whatsapp features) येईल. यातील खास बाब ही आहे की युजर्स वॉलपेपरच्या ओपेसीटीमध्ये देखील बदल करु शकतात.

२९ नवे डार्क वॉलपेपर्स

युजर्स ३२ नवे ब्राइट वॉलपेपर्स, २९ नवे डार्क वॉलपेपर्स, कस्टम वॉलपेपर आणि सॉलिड कलरमध्ये आपल्या हिशोबानं निवडू शकतात. जर आपण जुना वॉल पेपर निवडला तर आपण व्हॉट्सअॅप अर्काईव्ह हा पर्याय निवडू शकता.

अनेक पर्याय मिळणार

जर आपण सॉलिड रंगांना नव्या वॉलपेपरप्रमाणे सेट करु इच्छित असाल तर आपण याला व्हॉट्सअॅप डुडलवर घेऊ शकता. व्हॉट्सअॅप बीटा इन्फोने सांगितलंय की, सध्या याला बीटा युजर्ससाठी लॉन्च करण्यात आलं आहे. लवकरच याला स्टेबल व्हर्जनमध्ये सर्वांसाठी लॉन्च करण्यात येणार आहे.