how to download whatsapp photowhatsapp मेसेजिंग प्लॅटफॉर्म फोटो, व्हिडिओ, डॉक्यूमेंट फाईल्स, चॅटिंग या सगळ्याचसाठी एक सोयीचं आणि तितकंच सोपं साधन ठरलं आहे. पण एखाद्यावेळी व्हॉट्सअ‍ॅपवर आलेला महत्त्वाचा फोटो, डॉक्यूमेंट फाईल चुकून डिलीट झाली, तर मोठी समस्या येऊ शकते. पण आता व्हॉट्सअ‍ॅपवर अशा डिलीट झालेल्या ( how to download whatsapp photo) गोष्टी आता सहजपणे परत मिळवता येणार आहेत. एका सिंपल ट्रिकने फोटो, व्हिडिओ रिकव्हर करता येऊ शकतो. पण यासाठी एक अट आहे. जर तुमचा डेटा डिलीट होऊन 30 दिवसांहून अधिक काळ गेला असल्यास तो फोटो किंवा व्हिडिओ रिकव्हर करता येणार नाही.

Must Read

1) भारतात तीन-चार महिन्यात कोरोनाची लस उपलब्ध

2) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कर्तृत्ववान मराठा स्त्री यावी - आशिष शेलार

3) 4 दिवसांच्या घसरणीनंतर पुन्हा वधारले सोन्याचे भाव

4) सचिन, विराट नाही तर या खेळाडूने वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियात सर्वाधिक रन

Gmail शी व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट लिंक -

अँड्रॉईड युजर्सला व्हॉट्सअ‍ॅपवर आपले फोटो, व्हिडिओ आणि इतर अटॅचमेंच सिक्यॉर ठेवण्यासाठी सर्वात सिंपल सोल्यूशन Gmail चं मिळतं. सर्व अँड्रॉईड फोन, बायडिफॉल्ट एका Gmail अकाउंटशी लिंक असतात. लिंक्ड Gmail अकाउंटच्या मदतीने व्हॉट्सअ‍ॅप ( how to download whatsapp photo) डेटा सेफ ठेवला जाऊ शकतो. युजर्स अ‍ॅपच्या सेटिंग्जमध्ये जावून गुगल ड्रॉइव्हवर डेटा बॅकअप घेऊ शकतात, आणि त्यानंतर तो डेटा दुसऱ्या कोणत्याही डिव्हाईसवर रिस्टोर केला जाऊ शकतो.

असे डाउनलोड करा डिलीट फोटो -

व्हॉट्सअ‍ॅपवर अशाच फाईल डाउनलोड केल्या जाऊ शकतात, ज्या युजरने व्हॉट्सअ‍ॅपवर डिलीट केल्या नाहीत. संपूर्ण कन्वर्सेशन डिलीट केलं असल्यास, तो कंटेंट परत मिळणार नाही. व्हॉट्सअ‍ॅप चॅट ओपन करा, जो फोटो डाउनलोड करायचा आहे, त्यावर क्लिक करा. फोटो डाउनलोड होईल. परंतु फाईल रिसिव्ह झाल्याच्या 30 दिवसांनंतर असं करता येणार नाही.

अनेकदा असं डाउनलोड करताना व्हॉट्सअ‍ॅप एरर मेसेज दाखवतो. 'can't download, please ask that it be resent to you?' असं लिहून येतं, अशावेळी इंटरनेट कनेक्शन अ‍ॅक्टिव्ह आहे की नाही ते तपासा. त्याशिवाय फोनचा डेटा आणि टाईम योग्य असणं आवश्यक आहे. डेट चुकीची असल्यास, व्हॉट्सअ‍ॅप सर्व्हरशी कनेक्ट होणार नाही. डिव्हाईसमध्ये स्टोरेज स्पेस नसल्यासही असा एरर मेसेज येऊ शकतो.