what-is-one-nation-one-gold-system

संपूर्ण देशात लवकरच ‘वन नेशन, वन गोल्ड’ (One Nation, One Gold ') ही व्यवस्था लागू होण्याची शक्यता आहे. या व्यवस्थेनुसार, देशातील कोणत्याही राज्यात सोन्याचा एकसारखाच भाव असेल. देशभरात ही व्यवस्था आणण्याचा विचार सरकारकडून सुरु आहे.


Must Read  भारतात बहुतकरुन सोनं (gold) आयात केलं जातं आणि त्याची किंमत एकच असते. मात्र, वेगवेगळ्या राज्यांमध्ये ते वेगवेगळ्या किंमतीत विकलं जातं. खरतरं विविध भागांमध्ये सोन्याच्या किंमती ज्वेलर्स असोसिएशन निश्चित करत असतात. त्यामुळे सोन्याचे भाव काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी जास्त असतात.दरम्यान, ज्वेलर्स असोसिएशनची मागणी आहे की, सरकारने देशात ‘वन नेशन, वन गोल्ड’ ही व्यवस्था आणावी. यामुळे ग्राहकाला देशभरात सर्व ठिकाणी एकाच किंमतीत सोनं उपलब्ध होईल. मात्र, यावर सरकार काय निर्णय घेते हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

सोन्याच्या दराबाबत बोलायचं झालं तर उत्तर भारतात सोन्याचा भाव वेगळा तर दक्षिणेत वेगळा आहे. गेल्या काही वर्षात उत्तर भारतात सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. तर दक्षिणेत याच्या तुलनेत सोन्याच्या किंमती काहीशा कमी आहेत. दक्षिणेतील ज्वेलर्स ग्राहकांकडून कमी मार्जिन वसूल करतात तर उत्तर भारतातील व्यापारी जास्त.सोन्या-चांदी (silver) च्या व्यापाऱ्यांची मागणी आहे की, वाढत्या दराने सोन्याच्या मागणीत घट झाली आहे. यामुळे व्यवसायावर परिणाम होत आहे. त्यामुळे एकच किंमत सर्व जागी लागू झाली तर याचा ग्राहकांना मोठा फायदा होईल. ते कुठल्याही राज्यातून सोन खरेदी करु शकतात.