what-is-fibromyalgia-disease-its-symptoms

किमान आठ तासांची पुरेशी झोप (sleep) घ्यावी असं सांगितलं जातं. मात्र अनेकांना पुरेशी झोप घेऊनही  अनेकदा झोप पूर्ण झाली तरी थकवा जाणवतो. याला फायब्रोमायल्जिया किंवा फायब्रोमायल्जिया सिंड्रोम कारणीभूत असू शकतो. ही अशी स्थिती आहे जी संपूर्ण शरीरात वेदना आणि दाह निर्माण करते. फायब्रोमायल्जिया ग्रस्त लोकांना बर्‍याचदा अत्यधिक थकवा किंवा झोप, मूड किंवा स्मृती समस्या अशी लक्षणं दिसतात. फायब्रोमायल्जिया पुरुषांपेक्षा स्त्रियांवर जास्त परिणाम करतो. यामुळे होणाऱ्या वेदना, थकवा आणि झोपेचा त्रास यामुळे दैनंदिन काम कऱण्याच्या क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो. फायब्रोमायल्जिया असलेल्या लोकांना पुरेशी झोप घेऊनसुद्धा झोपेनंतर थकल्यासारखं वाटतं. यासह बर्‍याच रुग्णांना झोपेत श्वसन समस्या आणि रिस्टलेस लेग सिंड्रोमसारखे इतर आजारही बळावतात.

मेंदूतील नसा आणि वेदना या शरीरातील समस्येमुळे फायब्रोमायल्जिया (Fibromyalgiaहोऊ शकतो. फायब्रोमायल्जियाची तुलना संधिवाताशी केली जाते. संधिवाताप्रमाणेच फायब्रोमायल्जियामध्ये वेदना आणि थकवा जाणवतो.  मात्र संधिवाताप्रमाणे फायब्रोमायल्जियामध्ये सांध्यांचा लालसरपणा आणि सूज किंवा सांधे खराब होत नाहीत. या समस्येचा सामना करण्याच्या चिंतेमुळे नैराश्यसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.

myupchar शी संबंधित एम्चे डॉ. केएम नाधीर यांनी सांगितलं की, डॉक्टर आणि संशोधक यामागची कारणं शोधू शकले नाहीत. मात्र आधीपासून असलेले काही आजार फायब्रोमायल्जियास कारणीभूत ठरतात किंवा त्याची लक्षणं अधिक तीव्र करू शकतात. हे बहुधा अनुवांशिक असतं, मात्र तरी संशोधकांना अद्याप जनुक ओळखणं शक्य झालं नाही. इतर घटकांमध्ये शारीरिक किंवा भावनिक आघाताचाही समावेश आहे. पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस सिंड्रोममुळेदेखील ही समस्या उद्भवू शकते.

Must Read

1) उद्यापासून कर्फ्यू; महाराष्ट्रातही लागू होणार का पुन्हा Lockdown?
2) 2030 पासून पेट्रोल आणि डिझेल वाहनांच्या विक्रीवर बंदी
3) लवकरच PUBG मोबाइल इंडिया होणार लाईव्ह; जुन्या युजर्सच्या GOOD NEWS!
4) विराट नसताना रहाणेला कर्णधार केलं तर... पॉण्टिंगने दिला धोक्याचा इशारा
5) शाळेच्या मुख्याध्यापकांसोबत love..Sex आणि धोका

बर्‍याच प्रकरणांमध्ये, क्रॉनिक फटीग सिंड्रोम आणि फायब्रोमायल्जिया समान असतात. myupchar.com शी संबंधित एम्सचे डॉ. नबी वाली म्हणतात की, क्रॉनिक फटीग सिंड्रोम हा एक अवघड डिसऑर्डर आहे ज्यामध्ये अत्याधिक थकवा आणि वेदना होतात जे फायब्रोमायल्जियामध्ये देखील होतात.

फायब्रोमायल्जिया असलेल्या बर्‍याच महिलांना गर्भवती होण्यास काहीच अडचण नसते आणि काही स्त्रियांमध्ये गर्भधारणेदरम्यान लक्षणं देखील सुधारल्याची नोंद आहे. मात्र काही महिलांना गरोदरपणात ही समस्या उद्भवू शकतात. गर्भधारणेच्या पहिल्या महिन्यांत लक्षणं तीव्र होऊ शकतात. काही सामान्य गर्भधारणेदरम्यान थकवा, ताणतणाव, मूड स्विंग्सच्या तक्रारी असतात ज्या संप्रेरक बदलांमुळे उद्भवतात. मात्र फायब्रोमायल्जिया असलेल्या स्त्रियांमध्ये या गोष्टी अधिकच बिघडू लागतात.

फायब्रोमायल्जियाच्या निदानासाठी डॉक्टर काही चाचण्या करतात. या आजाराच्या उपचारासाठी प्रथम वेदनापासून मुक्तता करणं हे डॉक्टरांचं लक्ष्य आहे. ते वेदना कमी करणारी औषधं, प्रतिरोधक औषधं, अँटीसिझर औषधं देऊ शकतात. या व्यतिरिक्त वैकल्पिक उपचारांमध्ये थेरेपी, एक्युपंक्चर, योग, ध्यान, नियमित व्यायाम, मसाज, रात्री पुरेशी झोप घेणं इत्यादींचा समावेश आहे. तसंच धूम्रपान टाळा. त्याचवेळी शरीरात जळजळ कमी करणारे पदार्थ खा. वेदना वाढवणारे पदार्थ टाळा.