बिग बॉस वीकेंड का वार च्या रविवारच्या एपिसोडमध्ये नोरा फतेहीNora Fatehi)ने घरातील मुलांकडून ’गर्मी’ गाण्यावर डान्स करून घेतला. तर नैना सिंह आणि शार्दुल पंडित यांच्यात घरात जाण्यापूर्वीच भांडण होते. बिग बॉस 14 च्या नव्या प्रोमोमध्ये नोरा फतेहीला तीन वाइल्डकार्ड कंटेस्टंटला इंट्रोड्यूस करताना सुद्धा पहात येईल. या निमित्ताने तिने घरातील मुलांकडून आपल्या सुपरहिट ’गर्मी’ गाण्यावर हुक स्टेप सुद्धा करून घेतल्या.

Must Read

1) गृहमंत्रीसह खासदार नवनीत राणा यांची कोर्टानं केली निर्दोष मुक्तता

2) IPL 2020 : प्ले-ऑफमध्ये मुंबईशी भिडणार ही टीम

3) काजल अग्रवालचे नवऱ्यासोबतच रोमँटिक क्षण PHOTO

4) दुसरी लाट! COVID-19 रुग्णांच्या संख्येत या राज्याने महाराष्ट्रालाही टाकलं मागे

5) ‘मास्क’ का घातला नाही असं विचारताच गोळी झाडून हत्या

6) बुमराहची दिल्ली विरुद्ध रेकॉर्डब्रेक कामगिरी

बिग बॉस 14 हळुहळु आपले खरे रंग दाखवू लागला आहे. यावेळी वीकेंड का वार ला फिल्म अभिनेत्री नोरा फतेही दिसणार आहे. जी घरातील सदस्यांसोबत दसरा सण देखील साजरा करेल. नोरा फतेही आपल्या शानदार डान्सिंग स्किलसाठी ओळखली जाते. ती घरातील सदस्यांकडून आपली फिल्म स्ट्रीट डान्सर 3डी च्या फेमस गाण्यावर डान्स करून घेते. याशिवाय ती शार्दुल पंडित, नैना सिंह आणि कविता कौशिकची घरात ओळख करून देते.

नव्या प्रोमोमध्ये नोरा फतेही पिवळ्या गाऊनमध्ये दिसत आहे. यामध्ये ती खुपच सुंदर दिसत आहे. मुलांना गर्मी गाण्यावर डान्स करताना पाहून सलमान आणि घरातील अन्य सदस्य स्वताला रोखू शकले नाहीत. तर घरात शिरण्यापूर्वीच शार्दुल पंडित आणि नैना सिंह यांच्यात खडाजंगी सुरू होते. नोरा फतेही बॉलीवुड अ‍ॅक्ट्रेस आहे आणि अनेक चित्रपटात तिने महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. याशिवाय ती आपल्या शानदार डान्ससाठी सुद्धा ओळखली जाते. तिची अनेक गाणी लोकप्रिय झाली आहेत.

नोरा फतेहीचे नुकतेच गुरु रंधवा सोबत एक नवे गाणे रिलीज झाले होते, जे खुप पसंत करण्यात आले. यावेळेचे बिग बॉस पूर्वीच्या तुलनेत खुप वेगळे आहे. घरातून सारा गुरपाल आणि शहजाद देओल बाहेर गेले आहेत.