vodafone idea recharge plantelecom - जिओनं (jio)अख्खं मार्केट काबीज केल्यानंतर आता वोडाफोनआयडियानं नव्या दमात पुन्हा एकदा मार्केटमध्ये जिओला टक्कर देण्यासाठी तयारी सुरू केली आहे. वोडाफोन-आयडियाकडून काही नवीन प्लॅन लाँच (recharge plan) करण्यात आले आहेत. हे प्लॅन पोस्टपेड अर्थात बिलिंग कार्ड वापरणाऱ्यांसाठी असणार आहेत.

कंपनीकडे असलेल्या योजनांच्या यादीमध्ये, लहान आणि मोठ्या सर्व प्रकारच्या योजना ग्राहकांना दिल्या जातात. कंपनीच्या अशा काही योजना आहेत, जे वापरकर्त्यांसाठी सर्वोत्कृष्ट ठरतील, त्यातील एक 699 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन आहे. काय आहे हा प्लॅन (recharge plan) जाणून घ्या.

Must Read

1) आता सोने खरेदी करताना व्हा स्मार्ट! नेमके कोणते अतिरिक्त दर लागतात घ्या जाणून

2) कारागृहाबाहेर नवनीत राणा यांचे धरणे आंदोलन

3) मंदिर खुली होणार असली तरी 'हे' नियम पाळावे लागणार!

4) बॉलिवूडच्या बाजीराव-मस्तानीच्या लग्नाला 2 वर्ष पूर्ण; पोस्ट शेअर

5) किरीट सोमय्या यांना मदत करायला तयार आहोत - आज्ञा नाईक

6) PHOTOS: रिंकू राजगुरूच्या नव्या फोटोंनी चाहत्यांना पाडली भुरळ

या प्लॅनमध्ये ग्राहकांना 150 GB डेटासह अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS दर दिवशी मिळणार आहेत. याशिवाय एन्टरटेन्मेंट प्लस आणि काही अॅडिशनल बेनिफिट्स मिळणार आहेत. यासोबत अॅमेझ़़ॉन प्राइम मेंबरशिप, झी-5 ओझे, Vi Movies and TV Subscription मिळणार आहे. अनलिमिटेड डेटा मिळणार आहे.

Vodafone Idea च्या प्लॅनची वैशिष्ट्यं

व्होडाफोन आणि आयडियानेदेखील 399 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन लाँच केला आहे. यामध्ये ग्राहकांना 40 GB डेटा आणि पुढचे 6 महिने 150 GB चा डेटाही मिळतो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएसची सुविधाही देण्यात आली आहे. पण कोणत्याही OTT प्लॅटफॉर्मच्या वापराची सुविधा देण्यात आलेली नाही.