vivo-latest-smartphone

चीनची आघाडीची स्मार्टफोन कंपनी विवो (Vivo) मोबाईलचे दोन मॉडेल्स विवो X60 (Vivo X60) आणि विवो X60 Pro चे (Vivo X60 pro) फोटो लीक झाले आहेत. लीक झालेल्या फोटोंमधून दोन्ही मॉडेल्सचे लूक आणि काही फीचर्स समोर आले आहेत. हे दोन्ही मॉडेल्स अँड्रॉईड 11 ओरिजन ओएसवर आधारित यूआयवर चालतील अशी माहिती आहे. स्मार्टफोन कंपनी 18 नोव्हेंबरला ही दोन्ही मॉडेल्स मार्केटमध्ये आणणार आहे. चिनी मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट WIBO ने या मॉडेलचे फोटो शेअर केले आहेत. त्याशिवाय टिप्सटरने या स्मार्टफोन्सच्या किंमतींबाबत खुलासाही केला आहे.

Must Read

1) मोदी सरकारची लाखो लोकांना दिवाळीची भेट

2) कोरोनामुळे भाजप आमदाराचा मृत्यू

3) तुमचा गॉडफादर कोण ? दानवेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

4) ...म्हणून राज ठाकरेंनी तिघींचं केलं कौतुक

5) Covid 19 : भारतात वॅक्सिनची गरज लागणार नाही, AIIMS ने दिले संकेत

X60 आणि X60 Pro चे फीचर्स

दोन्ही मॉडेलला चांगला लूक देण्यात आला आहे. X60 आणि X60 Pro मॉडेल्सला पंच होल डिस्प्ले देण्यात आला आहे. विवो X60 ची स्क्रीन फ्लॅट आहे आणि X60 Pro ला कर्ल्ड स्क्रीन देण्यात आली आहे. टिपस्टरने शेअर केलेल्या फोटोंनुसार, कंपनी 18 नोव्हेंबरला चीनमधील एका कार्यक्रमाच्या माध्यमातून दोन्ही ओरिजन ओएस असलेले मॉडेल्स लाँच करणार आहे.

विवो X60 ची किंमत

मिळालेल्या माहितीनुसार, विवो X60 आणि X60 Pro मध्ये सॅमसंगचा एक्सिनोस 1080 एसओसी ( Exynos 1080 SoC Processor) प्रोसेसर असेल. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 39,400 रुपये असेल. व्हिवो X60 ची ही बेस मॉडेल किंमत सांगितली जात आहे. प्रो व्हेरिएंटची किंमत थोडी जास्त असेल. X60 सिरीजमध्ये विवो X60 5G सुविधादेखील असू शकते.