virat kohli


sports - भारतीय संघाचा २७ नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलिया दौरा सुरू होणार आहे. सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलियात आहे. २७ तारखेला वन डे मालिका सुरू होणार आहे. त्यानंतर टी२० मालिका खेळवण्यात येणार आहे. तर दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात ४ सामन्यांची कसोटी मालिका रंगणार आहे. 

या मालिकेतील पहिली कसोटी झाल्यानंतर विराट मायदेशी परतणार आहे. जानेवारीमध्ये अनुष्का-विराटला (virat kohli) अपत्यप्राप्ती होणार असल्याने तो डिसेंबरअखेरीसच ऑस्ट्रेलियातून प्रयाण करणार आहे. याचदरम्यान विरूष्काच्या बाळाला जन्माआधीच ऑस्ट्रेलियन नागरिकत्वाची ऑफर देण्यात आली आहे.

Must Read

1) भारतात तीन-चार महिन्यात कोरोनाची लस उपलब्ध

2) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कर्तृत्ववान मराठा स्त्री यावी - आशिष शेलार

3) 4 दिवसांच्या घसरणीनंतर पुन्हा वधारले सोन्याचे भाव

4) सचिन, विराट नाही तर या खेळाडूने वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियात सर्वाधिक रन

विराट कोहली (virat kohli) हा खूप आक्रमक क्रिकेटपटू आहे. मैदानावर त्याचा वावरही तसाच असतो. सध्या कोहलीसारखे दिग्गज खेळाडू आणि भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांसारखे बडे संघ यांच्यात हातात कसोटी क्रिकेटचं भवितव्य आहे. विराट कसोटी मालिकेतून मध्येच माघार घेऊन जाणार असल्याचं मला समजलं. आम्ही असा अंदाज बांधला होता की त्याचं बाळ हे ऑस्ट्रेलियात जन्माला येईल आणि मग आम्ही त्या बाळाला नागरिकत्व देऊन थेट ऑस्ट्रेलियन असल्याचा दावा करू”, असं मजेशीर मत बॉर्डर यांनी व्यक्त केलं.

टी२० विश्वचषक स्पर्धा रद्द करून त्याजागी IPLचे आयोजन करण्यात आले. या मुद्द्यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. “मला हा निर्णय फारसा पटला नाही. क्रिकेट समितीने आंतरराष्ट्रीय स्पर्धेला प्राधान्य द्यायला हवं होतं. जर विश्वचषक स्पर्धा भरवणं शक्य नव्हतं, तर IPL च्या आयोजनाला परवानगी नाकारली जायला हवी होती. ही केवळ आर्थिक तडजोड होती असं मला वाटतं”, असं रोखठोक मत त्यांनी व्यक्त केलं.