kolhapur


kolhapur- राज्यात ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांची (coronavirus)संख्या कमी होत आहे; मात्र जागतिक पातळीवर कोरोनाची दुसरी लाट आली आहे. देशात, राज्यात आणि जिल्ह्यात जानेवारी- फेब्रुवारीत दुसरी लाट येण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी पुणे विभागीय आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी आरोग्य विभाग, जिल्हा शल्य चिकित्सक यांना एका परिपत्रकाद्वारे सूचना केल्या आहेत. 

परिपत्रकात म्हटले आहे की, प्रयोगशाळा तपासणी आयसीएमआर मार्गदर्शक सूचनांनुसार सुरू ठेवण्याची आवश्‍यकता आहे. कोरोना उद्रेकाच्या (coronavirus) सध्याच्या उतरणीच्या काळातही प्रयोगशाळा सर्वेक्षण सक्षमपणे सुरू ठेवावी. प्रतिदिन १४० तपासण्या कराव्यात. फ्लूसदृश आजाराचे नियमित सर्वेक्षण करावे. 

Must Read

1) मोदी सरकारची लाखो लोकांना दिवाळीची भेट

2) कोरोनामुळे भाजप आमदाराचा मृत्यू

3) तुमचा गॉडफादर कोण ? दानवेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

4) ...म्हणून राज ठाकरेंनी तिघींचं केलं कौतुक

5) Covid 19 : भारतात वॅक्सिनची गरज लागणार नाही, AIIMS ने दिले संकेत

फ्लूसारख्या आजाराची तत्काळ तपासणी करावी. गृहभेटींद्वारे सर्वेक्षण करावे. किराणा दुकानदार, भाजीवाले, विविध वस्तूंची विक्री करणारे विक्रेते, हॉटेल मालक, दूध घरपोच करणारे, घरगुती काम करणारे मालवाहतूक करणारे ट्रक चालक, हमाली रंगकाम, बांधकाम मजूर यांची तपासणी करावी.

रुग्ण वाढत राहिले, तर त्यासाठी ठराविक रुग्णालये सज्ज ठेवावीत. खाटा उपलब्ध करून द्याव्यात. प्रत्येक तालुक्‍यात विशिष्ट काळजी केंद्र, कोरोना आरोग्य केंद्र उभारावीत. जिल्हा (kolhapur)आणि महापालिका स्तरावरील समितीने सर्वच पातळीवर आढावा घेतला पाहिजे. 

औषध आणि ऑक्‍सिजन पुरवठा केला पाहिजे. जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव असणाऱ्या ठिकाणी औषध पुरवठा आणि ऑक्‍सिजन साठा करून ठेवला पाहिजे. नेहमीपेक्षा ५० टक्के जास्त औषधसाठा उपलब्ध करून ठेवावा. हा साठा साधनसामुग्री आणि बफर स्टॉक करून ठेवावा. औषध आणि ऑक्‍सिजनचा पुरवठा कमी पडू नये, यासाठी दक्ष राहिले पाहिजे. 

गंभीर रुग्णांना सेवा द्या

जिल्ह्यात आणि महापालिका क्षेत्रात कोरोनाचे गंभीर रुग्ण असणाऱ्यांना प्राधान्य द्या. त्यांना योग्य उपचार, रुग्णवाहिका व इतर सुविधा वेळेत मिळेल, याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही आहेत.