ipl-2020-rohit-sharma-suryakumar-yadav

यंदाच्या आयपीएलच्या हंगामात काही खेळाडू विशेष गाजले. IPL 2020 च्या निमित्तानं क्रीडारसिकांना या खेळाडूंचं कसबही पाहता आलं. त्यापैकीच एक नाव म्हणजे सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav). मुंबईच्या संघातील हा खेळाडू कधी विराटमुळं, कधी त्याच्या खेळीमुळं आणि कधी मैदानावरील त्याच्या अनोख्या अंदाजामुळं सातत्यानं सर्वांचं लक्ष वेधताना दिसला. अगदी अंतिम सामन्यातही त्यानं असं काही केलं, की नेटकऱ्यांनी त्याला कडक सॅल्युटच ठोकला. 

Video:https://www.iplt20.com/video/228094/suryakumar-sacrifices-his-wicket-for-rohit

दिल्ली आणि मुंबई अशा दोन संघांमध्ये यंदाच्या आयपीएलचा अंतिम सामना खेळला गेला. ज्यामध्ये दिल्लीनं मुंबईपुढं १५७ धावांचं लक्ष्य ठेवलं. या धावसंख्येचा पाठलाग करत असताना मुंबईचा संध भक्कम अशा परिस्थितीत आला. त्यावेळीच दहाव्या षटकामध्ये मैदानात असा एक प्रसंग घडला जो पाहून क्रीडारसिकांसोबतच नेटकऱ्यांनीही सूर्यकुमार यादव या खेळाडूला सलाम केलं. 

Must Read

1) आयपीएल इतिहासात हा रेकॉर्ड करणारा पहिला खेळाडू

2) सेहवागची बुमराहबद्दलची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली

3) अखेर NDAचं बिहारवर वर्चस्व, तेजस्वीचं स्वप्न भंगलं!

4) IPL 2020 : आयपीएलची किंग मुंबईच...

5) Asusने लाँच केले 4 नवे लॅपटॉप

रविचंद्रन अश्विननं (Ravichandran Ashwinटाकलेल्या चेंडूवर  rohit sharma रोहितनं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं फटका मारला. धाव घेण्यासाठी म्हणून रोहित पुढं आला. सूर्यकुमार यावेळी नॉनस्ट्राईक एंडला होता. त्याची नजर चेंडूवरचट होती. ही धाव न घेण्यालाठी म्हणून त्यानं रोहितला इशाराही केला. पण, रोहित तोवर पुढे आला होता. जेव्हा त्यानं हे पाहिलं तेव्हा अखेर सूर्यकुमारनं क्रिज सोडत तो दुसऱ्या एंडच्या दिशेनं गेला. 

प्रवीम दुबेनं चेंडू यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या दिशेनं फेकला. पंतनंही वेळ न गमावता स्टंपला चेंडू मारला. सूर्य़कुमारनं रोहितला ओलांडल्यामुळं हा त्याचा विकेट झाला आणि त्याला बाद घोषित करण्यात आलं. त्याला बाद झालेलं पाहून रोहितच्या चेहऱ्यावरही निराशाच पाहायला मिळाली. आपल्याकडून चूक झाल्याचं त्याच्याही लक्षात आलं.