uidai-said-aadhaar-helpline-1947

जर तुम्हाला आधार संदर्भातील कोणतीही समस्या येत असेल तर तुम्ही केवळ एक नंबर डायल करून तुमच्या शंकेचं निरसन करू शकता. आधार संदर्भात तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी तुम्ही 1947 या क्रमांकावर संपर्क करू शकता. UIDAI (Aadhaarने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. UIDAI ने त्यांच्या ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की या क्रमांकावर एकूण 12 भाषांमधून तुमची मदत केली जाईल.

UIDAI ने ट्विटरवर अशी माहिती दिली आहे की, आधारशी संबंधित सर्व समस्या एका फोन कॉलच्या माध्यमातून दूर होतील. ही आधार हेल्पलाइन 12 भाषांमध्ये तुमचे सहकार्य करेल-हिंदी, इंग्रजी, तेलुगू, कन्नड, तमिळ, मल्याळम, पंजाबी, गुजराती, मराठी, उडिया, बंगाली, आसामी आणि उर्दू या भाषात ही सेवा उपलब्ध आहे.

Must Read

1) धोनीने संधी दिलेल्या फास्ट बॉलरची क्रिकेटमधून निवृत्ती

2) जयसिंगरावांनी पक्ष सोडला, पंकजा मुंडेंनी दिली महत्त्वाची प्रतिक्रिया

3) ...नाहीतर तुमचे सगळे धंदे बाहेर काढणार; निलेश राणेंचा भास्कर जाधवांना इशारा

4) RBI ची मोठी घोषणा!

5) पठ्ठ्याने खरोखरच किडनी विकून आयफोन घेतला

6) कतरिना कैफने सोशल मीडियावर शेअर केला बिकिनीमधला फोटो,

या क्रमांकावरील सेवा तुमच्यासाठी 24 तासांसाठी उपलब्ध आहे. या सुविधेसाठी कॉल सेंटर प्रतिनिधी सकाळी सात ते रात्री 11 वाजेपर्यंत (सोमवारी ते शनिवारी) उपलब्ध असतात. रविवारी हे प्रतिनिधी सकाळी 8 ते संध्याकाळी 5 या वेळेतच  उपलब्ध असतात. ही सेवा पूर्णपणे मोफत आहे. याठिकाणी तुम्हाला आधार नोंदणी केंद्र, नोंदणी केल्यानंतर आधार क्रमांकाचे स्टेटस आणि अन्य आधार संबंधातील माहिती मिळेल. आधार कार्ड हरवल्यास किंवा पोस्टाच्या माध्यमातून ते तुमच्यापर्यंत अद्याप पोहोचले नसल्यासही तुम्ही याठिकाणाहून माहिती मिळवू शकता.

अशाप्रकारे बनवा PVC आधार कार्ड

1. नवीन आधार पीव्हीसी कार्डसाठी तुम्हाला UIDAI च्या वेबसाइटवर जावे लागेल

2. याठिकाणी 'My Aadhaar' सेक्शनमध्ये जाऊन 'Order Aadhaar PVC Card'वर क्लिक करा

3. याठिकाणी तुम्हाला 12 अंकी आधार कार्ड क्रमांक किंवा 16 अंकी व्हर्च्यूअल आयडी किंवा 28 अंकी आधार एनरोलमेंट आयडी टाकावा लागेल.

4. यानंतर सिक्योरिटी कॅप्चा कोड टाकून सेंड ओटीपीवर क्लिक करा

5. त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाइलवर आलेला ओटीपी एंटर करा.

6. यानंतर तुम्हाला आधार पीव्हीसी कार्डाचा प्रीव्ह्यू दिसेल

7. खाली देण्यात आलेल्या पेमेंट करण्याच्या पर्यायावर क्लिक करा

8. पेमेंट पेजवर गेल्यानंतर तुम्हाला 50 रुपये फी भरावी लागेल.

9. पेमेंट पूर्ण झाल्यानंतर तुमच्या आधार पीव्हीसी कार्डाची प्रोसेस पूर्ण होईल

5 दिवसांमध्ये येईल तुमचे आधार पीव्हीसी कार्ड

जेव्हा ही प्रोसेस पूर्ण होईल त्यानंतर 5 दिवसांच्या आतमध्ये डिपार्टमेंटकडून भारतीय डाक विभागाकडे कार्ड पाठवले जाईल. पोस्टाच्या माध्यमातून कार्ड तुमच्या घरी पोहोचवले जाईल.