uddhav thackeray


politics- “शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष राहिलेला नाही, गद्दारी करून ते सत्तेत गेले आहेत. उद्धव ठाकरे हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे नाहीत. तडजोड करणारे, पदासाठी हवं ते करणारे आहेत. त्यामुळे हिंदुत्व विचार व शिवसेना हे समीकरण नाही.” असा घणाघात भाजपा नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray)यांच्यावर केला आहे. तसेच, आमदार राम कदम यांच्या जनआक्रोश यात्रेला आपला संपूर्ण पाठिंबा असल्याचंही त्यांनी माध्यमांसमोर सांगितलं.

Must Read

1) धोनीने संधी दिलेल्या फास्ट बॉलरची क्रिकेटमधून निवृत्ती

2) जयसिंगरावांनी पक्ष सोडला, पंकजा मुंडेंनी दिली महत्त्वाची प्रतिक्रिया

3) ...नाहीतर तुमचे सगळे धंदे बाहेर काढणार; निलेश राणेंचा भास्कर जाधवांना इशारा

4) RBI ची मोठी घोषणा!

5) पठ्ठ्याने खरोखरच किडनी विकून आयफोन घेतला

पालघर साधू हत्याकांड प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याच्या मागणीसाठी, आज भाजपा आमदार राम कदम यांनी जनआक्रोश यात्रेचं आयोजन केलं होतं. मात्र, ही यात्रा निघण्या अगोदरच राम कदम यांना पोलिसांनी त्यांच्या निवास्थानावरून ताब्यात घेतलं होतं. यानंतर भाजपा नेते नारायण राणे व आमदार नितेश राणे यांनी राम कदम यांची भेट घेण्यासाठी खार पोलीस ठाणे गाठलं होतं. यानंतर नारायण राणेंनी माध्यमांशी संवाद साधला. (politics)

महाराष्ट्रात सरकारमध्ये  क्षमता नाही –

यावेळी राणे म्हणाले की, ”पालघरमध्ये साधुंची जी हत्या झाली. ज्या प्रकार झाली. त्यानंतर सरकारने त्या अत्याचाराबद्दल जे आरोपी आहेत, गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरोधात योग्य कारवाई न केल्याने, हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याच्या मागणीसाठी आमदार राम कदम यांनी हे आंदोलन केलं आहे. भारत हा साधु-संतांचा देश आहे, इथं त्यांच्यावर अत्याचार नाही झाले पाहिजे, अशी सर्वांचीच भावना आहे. 

त्यामुळेच भाजपा आमदार राम कदम यांनी हे आंदोलन सुरू केलं आहे. आम्ही त्यांना संपूर्णपणे पाठिंबा देत आहोत. त्यांची जी मागणी आहे की, हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं जावं, याबद्दल देखील आम्ही सहमत आहोत. आम्ही असं समजतो की हे जे सध्या महाराष्ट्रात सरकार आहे, त्यांची क्षमता नाही किंवा ते या साधुंना न्याय मिळावा या मताचे नाहीत.”

हिंदू धर्माविरोधात जाण्यासाठीच ते मुख्यमंत्री बनले –

यावेळी राज्य सरकार हिंदू विरोधी आहे का? असा प्रश्न राणेंना विचारण्यात आल्यावर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत म्हणाले की, ”ज्या दिवशी त्यांनी भाजपाबरोबर गद्दारी करून, ते स्वतः मुख्यमंत्री होऊन बसले. तर तुम्ही समजलं पाहिजे की, हिंदू धर्माविरोधात जाण्यासाठीच ते मुख्यमंत्री बनले. राष्ट्रवादी व काँग्रेससोबत हातमिळवणी केली व हिंदुत्वाचा त्याग केला. मग त्यांच्याकडून साधू-संतांचे रक्षण करण्याची काय अपेक्षा करणार?”