पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर (Highway) गोकुळ शिरगांव एमआयडीसीच्या आत येणाऱ्या मुख्य प्रवेश रस्त्याजवळ वाईड वील पाईप घेऊन जाणारा मल्टीअॅक्सल ट्रेलर शनिवारी पहाटे पलटी झाला. यामुळे एमआयडीसीत जाणारी वाहतूक पूर्ण दिवस पर्यायी मार्गाने सुरु होती. संभापूर येथून हा ट्रेलर चित्रदुर्ग (कर्नाटक) कडे जात होता. गोकुळ शिरगांव एमआयडीसी व कणेरीकडे जाण्यासाठी महामार्गावरील पुलाला तटण्याची शक्यता असल्याने चालकाने एमआयडीसी सेवा रस्त्यावरून जाणे पसंत केले. यावेळी मागील चाक गटारीत गेल्याने ट्रेलरचा मागचा भाग उलटला शनिवारी सायंकाळी हा मल्टीअॅक्सल ट्रेलर व्यवस्थित करण्यात आला. त्यामुळे कागलकडे जाणारी वाहतूक दुपारपासून संथगतीने सुरु होती.

Must Read

1) महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकांबाबत मोठी बातमी

2) राज्यात Corona चे Active रुग्ण वाढले

3) सरकारने शाळा सुरू करण्याची घाई करू नये, भाजपच्या प्रवीण दरेकर यांची मागणी

4) धर्मासाठी सिनेसृष्टी सोडून मौलवीशी केला निकाह; सना खान

5) नगरसेवकाला दोरीने बांधून गटाराच्या पाण्यात बसवलं;

गोशिमाचे पदाधिकारी व रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी यांनी सदर ट्रेलरची पाहणी केली व यापूर्वी एम. आय. डी. सी मध्ये येणार कंटेनर, ट्रक हे लहान अॅक्सलचे होते त्यामुळे सदर प्रवेश रस्ता योग्य होता, मात्र सध्या औद्योगिक वसाहतीमध्ये येणारे ट्रेलर हे मल्टीअॅक्सल आहेत व वाहतूक वाढलेली आहे त्यामुळे मुख्य रस्त्यावरील प्रवेश रस्ता हा मल्टीअॅक्सल ट्रेलरना वळण घेतेवेळी अपुरा पडत आहेत. याचा विचार करून गोशिमाच्या वतीने गोकुळ शिरगांव औद्योगिक वसाहतीमध्ये प्रवेश करणारे मुख्य प्रवेश रस्ता मोठे करणेसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांना वेळोवेळी गोशिमाच्या वतीने पाठपुरावा केलेला आहे व सध्या पुन्हा एकदा प्रस्ताव पाठविला आहे. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने लवकरात लवकर औद्योगिक वसाहतीमध्ये प्रवेश करणारा मुख्य प्रवेश रस्ता मोठा करण्यात यावे अशी मागणी उद्योजकांकडून होत आहे.