tom and jerry movie

गेल्या कित्येक वर्षांपासून अबाल-वृद्धांच्या मनावर राज्य करणारं कार्टून म्हणजे टॉम अँड जेरी. उंदीर आणि मांजराचा खेळ, त्यांच्यातील मस्ती आणि भांडणं या कार्टुनमध्ये दाखविण्यात आलं असून त्यातील टॉम(tom) (मांजर) व जेरी(Jerry) उंदीर) या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर आजतागायत राज्य केलं आहे. विशेष म्हणजे हे कार्टुन आता लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या दोघांवर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्यात येत असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Must Read

1) धोनीने संधी दिलेल्या फास्ट बॉलरची क्रिकेटमधून निवृत्ती

2) जयसिंगरावांनी पक्ष सोडला, पंकजा मुंडेंनी दिली महत्त्वाची प्रतिक्रिया

3) ...नाहीतर तुमचे सगळे धंदे बाहेर काढणार; निलेश राणेंचा भास्कर जाधवांना इशारा

4) RBI ची मोठी घोषणा!

5) पठ्ठ्याने खरोखरच किडनी विकून आयफोन घेतला

टॉम अँड जेरी यांच्यावर आधारित हा चित्रपट ३ डी लाइव्ह अॅनिमेशन असून यात रिअर लाइफ वर्ल्डमध्ये टॉम आणि जेरी या दोन अॅनिमेटेड कॅरेक्टरचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या चित्रपटात अन्य कलाकारांसोबत टॉम व जेरी हे दोन अॅनिमेटेड पात्र उभी करण्यात आली आहेत.


नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरने प्रेक्षकांची मनं जिंकली असून त्याच अंदाजात टॉम आणि जेरी प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. यात न्युयॉर्कमधील एका आलिशान हॉटेलमध्ये भारतीय रीतीरिवाजानुसार एका लग्नसोहळ्याचं आयोजन केलं असतं. या सोहळ्यात अचानक जेरी पोहोचतो आणि धुमाकूळ घालतो. त्यामुळे जेरीला पळवून लावण्यासाठी हे या लग्नाची वेडिंग इव्हेंट प्लॅनर टॉमची नियुक्त करते. मात्र, या हॉटेलमध्ये टॉम आणि जेरीचा पकडापकडीचा खेळ सुरु होतो. ज्यामुळे लग्नाच्या कार्यात अनेक मजेशीर किस्से घडतात.

दरम्यान, या चित्रपटात क्लो ग्रेस मोरेट्ज (Chloe Grace Moretz) , मायकेल पेन्या (Michael Penya) , रॉब डलेनी (Rob Dalany), कॉलिन जोस्ट आणि केन जेंग ही कलाकार मंडळी महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेलया या ट्रेलरने अनेकांची मनं जिंकली असून आतापर्यंत या ट्रेलरला २ लाख ३४ हजार ६९३ पेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत.