tiger-shroff-sports-yellow-hot-pants

अॅक्शन सीनसाठी खासकरुन ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे टायगर श्रॉफ (Tiger shroff). सोशल मीडियावर सक्रीय असलेला टायगर अनेकदा त्याच्या वर्कआऊटचे किंवा डान्सचे व्हिडीओ, फोटो शेअर करत असतो. यावेळीदेखील त्याने असाच एक फोटो शेअर केला आहे. मात्र या फोटोपेक्षा त्याने दिलेल्या कॅप्शनची जास्त चर्चा रंगली आहे.

Must Read

1) जिल्ह्यात पुन्हा कोरोनाग्रस्तांचा आकडा पाचशेपार

2) जेलमधून सुटल्यानंतर अर्णब गोस्वामीचं शक्तीप्रदर्शन

3) शेअर बाजार तेजीतच; गुंतवणूक ‘करेक्शन’नंतर

4) HIV टाळण्यासाठी दररोज औषध घेण्याची नाही गरज पण...

5) रणबीर पहिल्यांदाच आलियासोबतच्या Relationship बाबत काय म्हणाला...

टायगर सध्या मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत असून तेथील काही फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात एका फोटोमध्ये तो पिवळ्या रंगाच्या शॉर्ट्समध्ये (हाफ पॅण्ट) दिसून येत आहे. विशेष म्हणजे हा फोटो शेअर करत त्याने नेटकऱ्यांची माफी मागितली आहे.


“मी पिवळ्या रंगाची शॉर्ट्स परिधान केल्यामुळे मला माफ करा. एकतर मी खरंच मोठा झालोय किंवा या लॉकडाउनमध्ये ही पॅण्ट लहान झाली आहे”, असं मजेशीर कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे.

दरम्यान, टायगर लवकरच गणपथ या आगामी चित्रपटात झळकणा आहे. या चित्रपटाचं अलिकडेच चित्रीकरण सुरु झालं आहे. ‘गणपथ’सोबत टायगर ‘हिरोपंती 2’ मध्येदेखील झळकणार आहे.