smartphone


भारतातील स्मार्टफोन (smartphone) आणि स्मार्ट टीव्हीचा नंबर एक ब्रँड असलेल्या एमआय इंडियाने आज जाहीर केले की त्यांनी चेन्नईत 33.3 लाख रुपयांचे बनावट एमआय(श्याओमी) (xiaomi) उत्पादने आणि बंगलोरमध्ये 4 पुरवठादार पकडले आहेत. बनावट स्मार्टफोनविरूद्ध एमआय कंपनीने एक मोठी मोहिम उघडली आहे. आणि हे बनावट मोबाईल पकडणे हा या मोहिमेचा भाग आहे. या प्रकरणात कंपनीने स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली गेली आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बाजारात छापा टाकण्यात आला. ज्यात बनावट स्मार्टफोन सापडले आहेत.

Must Read

1) रोहित पवारांना मिळणार मोठी जबाबदारी?

2) अवघ्या १ रुपयांत खरेदी करा सोनं ! PhonePe ची ऑफर

3) ऑनलाईन काम देण्याच्या नावाखाली घरी बोलावून इंजिनिअर मुलीवर बलात्कार

4) "शरद पवार अजितदादांना नाही सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करतील”

5) त्या आजाराने गेला असता बाहुबलीच्या भल्लालदेवचा जीव


तक्रारीच्या आधारे कंपनीच्या काही अधिकाऱ्यांसह काही पोलिस अधिका्यांनी दुकानांवर छापा टाकला आणि तीन दुकानांतून बनावट स्मार्टफोन (smartphone) जप्त केले. या दुकानांमधून मोबाइल बॅक कव्हर, हेडफोन, पॉवर बँक, चार्जर आणि इयरफोनसह एकूण 3000 उत्पादने (fake mobiles) जप्त करण्यात आली आहेत. दोन्ही शहरांमधील या दुकानांच्या मालकांना बनावट एमआय उत्पादने विकल्याबद्दल अटक केली आहे. चौकशी दरम्यान असे आढळले की हे लोक बर्‍याच काळापासून अशी उत्पादने विकत आहेत आणि बाजारात विक्री करीत आहेत.

बनावट उत्पादनांमुळे केवळ ग्राहकांचा अनुभव खराब होत नाही तर ग्राहकांच्या सुरक्षेची व आरोग्यासही धोका निर्माण होतो. तसेच, अशी बनावट उत्पादने गोपनीयता आणि डेटा सुरक्षिततेस धोका दर्शविते. काही प्रकरणांमध्ये अशी उत्पादने घातक देखील असू शकतात. गेल्या काही वर्षांमध्ये बनावट एमआय उत्पादनांची घटना वाढत असताना कंपनीने कारवाई वाढवण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना केली आहे.

आता तुम्हीही या कंपनीचा खरेदी केलेला मोबाईल खरा की खोटा हे ओळखायचे असल्यास कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन माहिती घ्या. तिथे बनावट आणि खरा मोबाईल कसा ओळखायचा याबाबत माहिती दिलेली आहे.