thief


kolhapur- ऐन दिवाळीत दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून झालेल्या घरफोडीत दोन लाख पंधरा हजार रोकडवर चोरट्यांनी (thief) डल्ला मारला. गुरुवारी रात्री येथे ही घटना घडली. याबाबत संदीप फराक्‍टे यांनी राधानगरी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

येथील पिराचीवाडी मार्गावरील महावितरणच्या शेजारी संदीप फराक्‍टे यांचा बंगला आहे. फराक्‍टे यांचे गावात किराणा मालाचे दुकान आहे. घरातील सर्व मंडळी दिवाळीमुळे दुकानाकडे गेली असता चोरट्यांनी (thief) घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून दुकानात विक्री होऊन आलेली २ लाख १५ हजार रोकड पळविली.

Must Read

1) मोदी सरकारची लाखो लोकांना दिवाळीची भेट

2) कोरोनामुळे भाजप आमदाराचा मृत्यू

3) तुमचा गॉडफादर कोण ? दानवेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

4) ...म्हणून राज ठाकरेंनी तिघींचं केलं कौतुक

5) Covid 19 : भारतात वॅक्सिनची गरज लागणार नाही, AIIMS ने दिले संकेत

राधानगरी पोलिसांनी पंचनामा केला. ठसेतज्ज्ञांना पाचारण केले. तज्ज्ञांनी कडी-कोयंडा दरवाजा व कपाटाचे ठसे घेतले आहेत. श्वानपथक इमारतीच्या परिसरातच घुटमळले. घटनास्थळी पोलिस निरीक्षक उदय डुबल, पोलिस उपअधीक्षक अनिल कदम यांनी भेट दिली.