the-corporator-was-tied-with-a-rope

(Politics) गटार आणि दूषित पाण्याच्या समस्येमुळे बऱ्याच काळापासून येथील स्थानिक त्रस्त आहेत. याकडे नगरसेवहकी काही काम करीत नाही, अशी तक्रार करीत असताना स्थानिकांनी नगरसेवकाला (Corporatorदोरीने बांधून गटाराच्या दूषित पाण्यात बसवलं. विरोध करण्याच्या या पद्धतीमुळे सध्या येथे जोरदार चर्चा सुरू आहे. गटारीच्या समस्येमुळे स्थानिक गटाराच्या पाण्यातून ये-जा करतात. त्याच पाण्यात नगरसेवकाला एका खुर्चीवर बसवण्यात आलं. मात्र नगरसेवक जात असल्याचे पाहून स्थानिकांनी दोरीने त्यांना खुर्चीसोबत बांधले. त्यानंतर या भागातील काही नागरिकांनी विरोध करणाऱ्या लोकांशी चर्चा करीत नगरसेवकाची सुटका केली.

हे प्रकरण वाराणसी वॉर्ड क्रमांक 79 अंबियापूर बाजार क्षेत्रातील आहे. येथील नगरसेवकाचे नाव तुपैल अंसारी असं आहे. या वॉर्डशी संबधित जवळील भागात बऱ्याच काळापासून गटारातीली पाणी रस्त्यावर येत आहे. इतकच नाही तर जागोजागी पिण्याचे पाईपलाइन फुटल्यामुळे नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध होत नाही. परिस्थिती इतकी वाईट झाली आहे की दूषित पाणी प्यायल्यामुळे येथील लहान मुलं आजारी पडत असल्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत. (Politics) स्थानिकांनी गटाराच्या समस्येविषयी सांगितलं की, येथील लोकांना गेल्या अनेक काळापासून या समस्येचा सामना करावा लागत आहे. या समस्येबाबत अनेक वेळा नगरसेवकांनाही सांगण्यात आलं. मात्र त्यांनी यावर कोणताही उपययोजना केली नाही.

त्यामुळे स्थानिकांमध्ये नगरसेवकाबद्दल राग होता. त्यामुळे स्थानिकांनी नगरसेवक तुफैल यांना परिसरात बोलावलं आणि बसण्यासाठी दिलेली खुर्ची स्वच्छ जागेऐवजी गटाराच्या पाण्याच्या मध्ये ठेवली. नगरसेवक खुर्चीवर बसल्यानंतर त्यांना दोरीने बांधलं. स्थानिक आणि नगरसेवकामध्ये बराच वेळ वाद सुरू होता. यावर नगरसेवकाचं म्हणणं आहे की, अनेकदा या समस्येबाबत अधिकाऱ्यांना सांगितलं आहे, मात्र त्यांनी यावर उपाययोजना केली नाही. यामध्ये माझी काहीच चूक नाही.