the-big-news-claims-of-serious-side-effects

चेन्नईमध्ये झालेल्या कोविडशील्ड ('Covidshield' vaccine) लशीच्या ट्रायलमध्ये भाग घेतलेल्या व्यक्तीने डोस घेतल्यानंतर गंभीर दुष्परिणाम झाल्याचे नोंदवले आहे. 40 वर्षीय व्यक्तीने सांगितलं की, लशीची खुराक घेतल्यानंतर त्याच्यावर गंभीर दुष्परिणाम झाला आहे. ज्यामध्ये व्हर्च्युअल न्यूरोलॉजिकल ब्रेकडाउन (neurological breakdown ) सारख्या समस्यांचा समावेश आहे. यासाठी व्यक्तीने 5 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

ही लस ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि फार्मा कंपनी अ‍ॅस्ट्रॅजेनेका यांनी तयार केली आहे. या व्यक्तीने सीरम इन्स्टिट्यूट आणि इतरांना पाठविलेल्या एका कायदेशीर नोटीशीत नुकसान भरपाईसह ट्रायल रोखण्याची मागणी केली आहे. या व्यक्तीने आरोप केला आहे की, ही लस सुरक्षित नाही. यासोबतच त्याने लशीची चौकशी, उत्पादन आणि वितरण रद्द करण्याची मागणीही केली आहे. या नोटीशीनुसार या लशीच भारतातील ट्रायल पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया करीत आहे. सीरम इन्स्टिट्यूटसोबत ही नोटीस आयसीएमआर आणि श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्यकेशन रिसर्चलाही पाठविण्यात आली आहे.


लस घेतल्यानंतर मेंदूवर (The brainतीव्र परिणाम किंवा आजार झाल्याचा आरोप व्यक्तीने केला आहे आणि लशीमुळे त्याच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाल्याचे विविध चाचण्यांनुसार पुष्टी करण्यात आली आहे. 1 ऑक्टोबर रोजी या व्यक्तीला लस देण्यात आली होती. लशीचे डोस घेतल्यानंतर मेंदूवर तीव्र एन्सेफॅलोपॅथीचा त्रास झाल्याचे त्या व्यक्तीचे म्हणणे आहे. सध्या होत असलेल्या त्रासामागे कोरोनाच्या ट्रायल कारणीभूत असल्याचे विविध चाचण्यांमधूनही स्पष्ट झाल्याचे व्यक्तीचं म्हणणं आहे. या नोटीसीनुसार ही लस सुरक्षित नाही आणि याचे भागधारक लशीचे परिणाम लपविण्याचा प्रयत्न करीत आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वीही या लशीच्या ट्रायलमध्ये एक चूक असल्याचे समोर आले होते. ट्रायलमध्ये ज्या लोकांना लशीची खुराक कमी दिली होती, त्यांच्यावर याचा 90 टक्के परिणाम झाला होता, तर ज्यांना दोन पूर्ण खुराक देण्यात आली होती, त्यांच्यामध्ये लशीचा 62 टक्के प्रभाव दिसून आला होता.