television-actor-leena-acharya-passed

(Death) टेलिव्हिजन अभिनेत्री लीना आचार्यचे (Leena Acharya) शनिवारी (21 नोव्हेंबर) निधन झाले आहे. नवी दिल्लीमध्ये अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला. किडनी फेल झाल्यामुळे लीनाची आयुष्याशी सुरू असलेली झुंज अखेर संपली. लीनाने 'हिचकी' या बॉलिवूड सिनेमामध्ये काम केलं होतं. तर गंदी बात, सेठ जी, आपके आ जाने से, क्लास ऑफ 2020 आणि मेरी हानिकारक बीवी यांसारख्या टेलिव्हिजन आणि वेब सीरिजमध्ये देखील काम केलं होतं.

लीना गेल्या दीड वर्षांपासून मुत्रपिंडाच्या आजारामुळे त्रस्त होती. तिच्या आईनेच तिला किडनी दान केली होती, तरी देखील या आजारातून लीनाचा जीव वाचू शकला नाही. लीनाच्या कुटुंबीयांसमवेत तिच्या सहकलाकारांवर देखील या घटनेनंतर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

लीनाबरोबर काम केलेल्या अनेक कलाकारांनी तिच्या अशा अचानक जाण्यामुळे दु:ख व्यक्त केलं आहे. 'Class Of 2020' मधील लीनाचा सहकलाकार प्रसिद्ध अभिनेता रोहन मेहरा (Rohan Mehra) याने असे लिहिले आहे की, 'RIP लीना आचार्य मॅम. गेल्यावर्षी या वेळी आपण क्लास ऑफ 2020 चे शूटिंग करत होतो. तुमची नेहमी आठवण येईल.'

सुरुवातीला अशी बातमी समोर येत होती की, (Death) लीनाचा मृत्यू कोरोनामुळे झाला. मात्र आता तिच्या मृत्यूचे कारण किडनी फेल असल्याचे समजत आहे. मृत्यूच्या काही दिवस आधी लीनाने सोशल मीडियावर मृत्यू संदर्भातच पोस्ट केली होती. ज्यावर तिचे चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

लीनाने शेअर केलेल्या ओळींचा असा अर्थ होतो की- मृत्यू फक्त श्वास घेऊन जाईल, यापेक्षा अधिक काय गमवावं लागेल. त्याचप्रमाणे तिने काही सकारात्मक विचार देखील या पोस्टमध्ये शेअर केले होते. मात्र शनिवारी तिचा असा अचानक मृत्यू झाल्यामुळे सर्वांसाठी हा मोठा धक्का होता.