tarak-mehta-ka-ooltah-chashmah

 'तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)’ या सीरिअलचं जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे. ही सीरिअल नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. या मालिकेतले संवाद, कलाकारांचा अभिनय आणि हलकी फुलकी कथा अशा अनेक पैलूंमुळे ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मुख्य कलाकारांसोबतच इतर कलाकारांचाही स्वतंत्र चाहतावर्ग आहे.या मालिकेमधल्या बबिता (Babita)च्या अदांनी जेठालाल (Jethalal)च काय चाहतेदेखील घायाळ होतात.

Must Read

1) गृहमंत्रीसह खासदार नवनीत राणा यांची कोर्टानं केली निर्दोष मुक्तता

2) IPL 2020 : प्ले-ऑफमध्ये मुंबईशी भिडणार ही टीम

3) काजल अग्रवालचे नवऱ्यासोबतच रोमँटिक क्षण PHOTO

4) दुसरी लाट! COVID-19 रुग्णांच्या संख्येत या राज्याने महाराष्ट्रालाही टाकलं मागे

5) ‘मास्क’ का घातला नाही असं विचारताच गोळी झाडून हत्या

6) बुमराहची दिल्ली विरुद्ध रेकॉर्डब्रेक कामगिरी

बबिताजीची भूमिका करणाऱ्या मुनमुन दत्ता (Munmun Dutta)ला सोशल मीडियावर मोठ्या संख्येने फॉलोअर्स आहेत. मुनमुनही नेहमी सोशल मीडियावर काहीतरी शेअर करत असते. नुकताच मुनमुनने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये गरबा खेळताना दिसत आहे. पारंपरिक गुजराती वेषात ती अतिशय देखणी दिसत आहे. तिच्या या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी कॉमेंट्स केल्या आहेत.

मुनमुन दत्ताने व्हिडीओ सोबत एक छानसं कॅप्शनही दिलं आहे. “ज्या क्षणी कॅमेरा सुरू होतो त्याच क्षणी मुनमुनचं बबितामध्ये रुपांतर होतं. शूटिंगच्या वेळी प्रचंड दमल्यामुळे मला ताप आला होता. पण काही हरकत नाही. चांगल्या मेहनतीचं फळ मिळतंच.”