pakistan super leaguesports news- करोना विषाणूच्या (coronavirus) प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पाकिस्तान सुपर लिग स्पर्धेचे प्ले-ऑफचे सामने रद्द करण्यात आले होते. आयपीएलचा तेरावा हंगाम संपुष्टात आल्यानंतर PSL च्या प्ले-ऑफ सामन्यांना सुरुवात झालेली आहे. 

पेशावर विरुद्ध लाहोर या सामन्यादरम्यान पेशावरच्या इमाम उल-हकने लाहोरसंघाकडून खेळणाऱ्या मोहम्मद हाफीजला ऑन कॅमेरा ट्रोल केलंय. वहाब रियाझच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पेशावर संघाने २० षटकांच्या अखेरीस ९ गड्यांच्या मोबदल्यात १७० धावांपर्यंत मजल मारली. फाफ डु-प्लेसिस, शोएब मलिक आणि हार्डस विल्जोएन यांनी पेशावरकडून आश्वासक खेळी केली.(sports news)

१७१ धावांचा पाठलाग करताना लाहोरच्या संघाने १२ व्या षटकापर्यंत चांगली कामगिरी केली. मोहम्मद इरफानने बेन डंकला बाद केल्यानंतर मोहम्मद हाफीज ड्रेसिंग रुमच्या दिशेने धावला. सलामोचक रमीझ राजा यांनी टाईम आऊटमध्ये मैदानावर उभे राहून रणनिती आखत असलेल्या वहाब, शोएब आणि इमाम यांच्याशी गप्पा मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी चर्चेदरम्यान इमाम उल-हक ने हाफिजला ट्रोल करत तो मला मगाचपासून सांगत होता की मला सू करायला जायचं आहे. इमामच्या तोंडून हे वाक्य ऐकताच रमीज राजा आणि शोएब-वहाब यांना हसू आवरलं नाही. 

पाहा हा व्हिडीओ…
मोहम्मद हाफिजने मैदानात आल्यानंतर आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत लाहोरच्या संघाला विजयपथावर आणलं. ४६ चेंडूत ७४ धावा करत हाफीजने संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. लाहोरने पेशावर संघावर ५ गडी राखून मात करत सामना जिंकला.