suresh halvankarpolitics news of maharashtra- सुरेश हाळवणकर आघाडी सरकारच्या एक वर्ष पूर्तीनिमित्त आयोजीत पत्रकार परिषदेत बोलत होते. हाळवणकर म्हणाले की, राज्यात भाजप आणि शिवसेना दोघे एकत्रित लढले. जनतेने दोन्ही पक्षांना जनादेश दिला. तरीसुद्धा शिवसेनेने जनादेशाचा अपमान करून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत सत्ता स्थापन केली. या सरकारमध्ये महत्वाची खाती राष्ट्रवादी काँग्रेसकडे आणि दुय्यम खाती शिवसेनेकडे आहेत. या सरकारमध्ये समन्वयाचा अभाव आहे.

बिहार निवडणुकीत (bihar election) नितीनशकुमार यांनी जनादेशाचा अपमान केला होता. ते वेगळे लढून पुन्हा भाजपसोबत आले. बिहारमध्ये भाजपने जना देशाचा अपमान केला नव्हता. परंतु महाराष्ट्रात शिवसेनेने जनादेशाचा अपमान केला. तसेच धमकीची भाषा मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी  केले. (politics news of maharashtra)


Must Read

1) कोल्हापुरात कडक बंदोबस्त,पोलिस सज्ज

2) जिल्ह्यात आज १९ रूग्णांची भर

3) मोठी बातमी : 'कोविडशील्ड' लशीमुळे गंभीर साइड-इफेक्ट; 5 कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी

4) डिसेंबर महिन्यात १४ दिवस बँका बंद राहणार

5) कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ कायम

6) हार्दिक पांड्याने मध्येच हा निर्णय घेऊन सर्वांना दिला आश्चर्याचा धक्का

हाळवणकर म्हणाले, राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार आणि ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. परंतु सरकारने केवळ १० हजार कोटी रुपयांची तुटपुंजी मदत जाहीर केली. कोणत्याही बाबतीत मदतीची गरज पडली तर मदत न करता सरकारकडून केंद्राकडे बोट दाखविण्यात येत आहे.