electricity billलॉकडाऊन काळात आकारलेल्या वाढीव बिलात सवलत दिली जाणार नाही, अशी भूमिका ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut)यांनी घेतली असली तरी या बाबत राज्य सरकार पुनर्विचार करणार असल्याचे संकेत मिळाले. ऊर्जा मंत्र्यांच्या भूमिकेचे राज्यात तीव्र पडसाद उमटल्यानंतर या सवलतींबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. (electricity bill)

वाढीव वीजबिलावरून (electricity bill) लोकांच्या भावना तीव्र आहेत आणि सवलती देण्याबाबत फेरविचार झाला पाहिजे अशी मागणी काही मंत्र्यांनी बैठकीत केली. त्यावर याविषयी राऊत यांच्यासोबत स्वतंत्रपणे बैठक घेऊ, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी स्पष्ट केले. विरोधकांच्या हल्ल्यानंतर सरकार नरमाईचे धोरण घेणार, असे दिसते.

Must Read

1) SBI च्या ग्राहकांसाठी नवी सुविधा, चेकबुकसाठी बँक देत आहे ही खास सेवा

2) "ठाकरे कुटुंबाचा व्यवसाय आहे तरी कोणता?

3) तिसऱ्यांदा 'बाबा' झाला RCBचा हा स्टार क्रिकेटपटू, PHOTO शेअर करत दिली गोड बातमी

4) भाजप आमदार प्रसाद लाड यांना कोरोनाची लागण

5) दिवसभराची झोप पूर्ण होऊनही थकवा का जाणवतो?


राऊत यांनी गुरुवारी अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली आणि लॉकडाऊन काळातील ३ महिन्यांच्या वीज बिलात सवलती देण्यासाठी ऊर्जा विभागाने दिलेल्या निधीच्या प्रस्तावावर विचार करण्याची मागणी त्यांनी केली. 

मंत्रिमंडळ बैठकीत मुख्य सचिव संजय कुमार यांनी महाविकास आघाडी सरकारने गेल्या वर्षभरात घेतलेले निर्णय आणि त्यांची अंमलबजावणी यासंदर्भात सादरीकरण केले. १ हजार ८०० कोटी रुपयांची ऊर्जा विभागाची मागणी आहे. आर्थिक अडचणीमुळे एवढी रक्कम देण्याबाबत अजित पवार राजी नसल्याचे समजते. आता मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे.