sonu sood helps amanjeet

कोरोनाच्या संसर्गामुळे अनेक ठिकाणी नियमावली जाहीर करत अजुन लॉकडाऊन सुरु आहे. मात्र या लॉकडाऊनच्या काळात सगळ्यांची मनं जिंकून खरा हिरो ठरला आहे तो म्हणजे अभिनेता सोनू सूद. अनेक गरजुंना मदत करण्यासाठी सोनूने मदतकार्य  (sonu sood helps amanjeet) हाती घेतले आहे. सोनूचं हे मदतकार्य गेले कित्येक महिने अहोरात्र सुरुच आहे. नुकतंच सोनूने पुन्हा एका गरजुला अशीच मदत केली असून त्याच्या शस्त्रक्रियेचा खर्च उचचला आहे. 

Must Read

1) कोल्हापुरात कडक बंदोबस्त,पोलिस सज्ज

2) जिल्ह्यात आज १९ रूग्णांची भर

3) मोठी बातमी : 'कोविडशील्ड' लशीमुळे गंभीर साइड-इफेक्ट; 5 कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी

4) डिसेंबर महिन्यात १४ दिवस बँका बंद राहणार

5) कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ कायम

6) हार्दिक पांड्याने मध्येच हा निर्णय घेऊन सर्वांना दिला आश्चर्याचा धक्का


अमनजीत  नावाचे गरजु गेल्या १२ वर्षापासून शारीरिक समस्यांमुळे त्रस्त होते. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांना शस्त्रक्रिया करणं शक्य नव्हतं. अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) ला जेव्हा अमनजीत यांच्या समस्येविषयी समजलं तेव्हा त्याने लगेचच त्यांना मदतीचा हात पुढे केला. यासंदर्भात अमनजीत यांच्या डॉक्टरांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

डॉक्टरांनी ट्विटमध्ये म्हटलंय, “अमनजीत यांची प्रकृती आता स्थिर आहे. तब्बल ११ तास त्यांच्यावर न्युरो सर्जरी (Neuro surgery) करण्यात आली. सोनू सूद यांनी लगेचच आमच्याशी संपर्क केला आणि मदत केली. इतकंच नाही तर शस्त्रक्रियेनंतरही त्यांनी चौकशी केली.त्यामुळे त्यांचे मनापासून आभार''.  

अभिनेता सोनू सूदने लॉकडाऊनमध्ये कित्येक ठिकाणी अडकलेल्या देशभरातील शेकडो मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवलं देशात, परदेशात (sonu sood helps amanjeet)अडकलेल्या विद्यार्थ्यांना बस आणि ट्रेनच्या माध्यमातून त्यांच्या गावी पोहोचवलं. पूरग्रस्त, शेतकरी, आजारी लोक अशा अनेकांना सोनूने आत्तापर्यंत मदत केली आहे. सोनूचं हे अथक कार्य सगळ्यांना अचंबित करणारं असून त्याला या सगळ्या गरजुंनी मनापासून आशिर्वाद देत ख-या आयुष्यातला हिरो मानलं असून देवदूताची उपमा दिली आहे.