sonia gandhi


सोनिया गांधी 73 वर्षांच्या आहेत. त्यांना दिल्लीच्या वाढत्या प्रदूषणाचा  (polution) त्रास होत आहे. हा त्रास होऊ नये म्हणून डॉक्टरांनी सोनिया गांधी (sonia gandhi) यांना काही दिवस दिल्ली सोडून शुद्ध हवेच्या ठिकाणी राहण्याचा सल्ला दिला.

या सल्ल्यानुसार सोनिया गांधी यांनी मुक्काम दिल्ली ऐवजी गोव्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. सोनिया यांच्यासोबत राहुल गांधीही गोव्यातच असतील. मागील काही आठवड्यांपासून दिल्लीत प्रदूषण (polution) वाढले आहे. हवेची गुणवत्ता घसरली आहे.


Must Read

1) भारतात तीन-चार महिन्यात कोरोनाची लस उपलब्ध

2) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कर्तृत्ववान मराठा स्त्री यावी - आशिष शेलार

3) 4 दिवसांच्या घसरणीनंतर पुन्हा वधारले सोन्याचे भाव

4) सचिन, विराट नाही तर या खेळाडूने वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियात सर्वाधिक रन


श्वसनाशी संबंधित विकार असलेल्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आहे. आजारी असलेल्यांनाही प्रदूषणाचा त्रास होत आहे. या प्रदूषित वातावरणाचा सोनिया गांधी यांच्या तब्येतीवर ताण पडू नये म्हणून डॉक्टरांनी त्यांना हवापालटाचा सल्ला दिला आहे.

या सल्ल्याचे पालन करत सोनिया गांधींनी दिल्ली ऐवजी गोव्यात राहण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये तपासण्यांसाठी सोनिया गांधी अॅडमिट झाल्या होत्या. तपासण्या झाल्यानंतर आणखी वैद्यकीय तपासणी करुन घेण्यासाठी सोनिया गांधी (sonia gandhi) काही दिवस परदेश दौऱ्यावरही गेल्या होत्या. या दौऱ्यात काही काळ प्रियांका गांधी आणि काही काळ राहुल गांधी सोनिया यांच्यासोबत होते. वैद्यकीय तपासण्यांनंतर भारतात परतलेल्या सोनिया आता दिल्ली सोडून गोव्यात राहणार आहेत.

गोव्यातील वातावरणात तब्येत सुधारेल, अशी आशा सोनिया गांधी यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.