मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली खरे (Sonali Khre) हिने चित्रपट, मालिका व नाटक अशा तिन्ही माध्यमातून रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. फोटो आणि व्हिडीओ ती पोस्ट करत असते. 
हिरव्या रंगाच्या साडीतले दिवाळी स्पेशल फोटोशूट सोनालीले केलं आहे. या ती खूपच सुंदर दिसतेय. 
सोनालीने दसऱ्याच्या मुहूर्तावर तब्बल ८ वर्षांनी छोट्या पडद्यावर कमबॅक केले आहे.
‘आज काय स्पेशल’ ह्या कुकिंगविषयक शोमध्ये सुत्रसंचालिकेच्या भूमिकेत ती दिसते आहे.
सोनाली खरेची मुलगी सनाया अभिनय क्षेत्रात पदार्पण करते आहे. ती ब्लड रिलेशन या लघुपटात झळकणार आहे. 
हे. या लघुपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सई देवधरने केले आहे. तर निर्मिती पर्पल मॉर्निंग मुव्हिजने केली आहे. 
सोनाली खरेचे चाहते तिच्या मुलीला अभिनय क्षेत्रात काम करताना पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. 
सोशल मीडियावर सोनालीला चांगले फॅन फॉलोईंग आहे.