sanjay rautpolitics news-  किरीट सोमय्या यांनी खोटे-नाटे आरोप करणं बंद करावं. तसेच जुनी थडगी त्यांनी उकरुन काढून नयेत, कारण आम्हालाही थडगी उकरतात येतात. पण आम्ही ती उकरली तर त्यात तुमच्या पापांचेच सांगाडे जास्त सापडतील, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी दिला आहे. सोमय्या यांना त्यांच्या पक्षातच गांभीर्यानं घेतलं जात नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

संजय राऊत (sanjay raut) म्हणाले, “सोमय्यां यांनी आम्ही काही बोलावं अस कोणतंही महान त्यांनी केलेलं नाही. ते जे करतात त्याच्याकडे त्यांचा पक्षही गांभीर्याने पाहत नाही. यामुळे अशा विधानांमुळे आपल्याच पक्षावरील लोकांचा विश्वास उडतो याचं त्यांनी भान ठेवावं. हे खोटे नाटे आरोप करणं बंद करावं, जुनी थडगी उकरायची म्हटलं तर आम्हालाही उकरता येतात. ती आम्ही उकरली तर त्यात तुमच्याच पापांचे सांगाडे जास्त सापडतील. “मला वेडं ठरवण्यासाठी संजय राऊत आणि शिवसेना नेत्यांमध्ये स्पर्धा लागली आहे, त्यांना माझ्या शुभेच्छा” असं सोमय्या यांनी म्हटलं होतं. यावर राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.(politics news)

Must Read

1) राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या पाच हजारांहून कमी; बरे होण्याचे प्रमाण ९२.४८ टक्क्यांवर

2) भारताच्या चोख प्रत्युत्तरामुळे पाकिस्तान बिथरला; सीमेवर बेछूट गोळीबार सुरू

3) रोज सकाळी लिंबू पाणी पिण्याचे होतात ‘हे’ 9 जबरदस्त फायदे

4) ...म्हणून ट्विटरने काही काळासाठी हटविला अमित शहांचा डीपी

वर्षभरात विरोधी पक्षांनी सरकार पाडण्याचे अघोरी प्रयत्न केले

महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी विरोधकांनी वर्षभरात अनेक ऑपरेशन करण्याचा प्रयत्न केला पण सरकारला थोडंही खरचटलं नाही. असे अघोरी प्रयत्न त्यांनी केले. त्यामुळे त्यांनी ही भाषा बंद केली पाहिजे आणि महाराष्ट्रासाठी कल्याणासाठी सहकार्याची भावना ठेवावी.