shivsenapolitics
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray)आणि रश्मी ठाकरे यांच्यावर भाजपचे नेते किरिट सोमय्या यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. रश्मी ठाकरे यांनी आतापर्यंत एकूण ४० जमीनींचे व्यवहार केले आहेत.

त्यातील ३० व्यवहार हे एकट्या अन्वय नाईक यांच्यासोबत केले आहेत. निदान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी तरी यावर उत्तर द्यावे. पण याबाबत उत्तर देण्याची हिंमत उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नाही, अशा शब्दात किरिट सोमय्या यांनी ठाकरेंवर टीका केली आहे. (politics )

Must Read

1) राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या पाच हजारांहून कमी; बरे होण्याचे प्रमाण ९२.४८ टक्क्यांवर

2) भारताच्या चोख प्रत्युत्तरामुळे पाकिस्तान बिथरला; सीमेवर बेछूट गोळीबार सुरू

3) रोज सकाळी लिंबू पाणी पिण्याचे होतात ‘हे’ 9 जबरदस्त फायदे

4) ...म्हणून ट्विटरने काही काळासाठी हटविला अमित शहांचा डीपी

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही भाजपचे नेते किरिट सोमय्या यांनी गंभीर आरोप केले आहेत. तसेच मुंबई उच्च न्यायालयात किशोरी पेडणेकर, ठाकरे सरकार, मुंबई महापालिका आणि एसआरएच्या विरोधात जनहित याचिका दाखल केल्याचंही सोमय्या यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी दिलेल्या वॉर्निंगलाही त्यांनी उत्तर दिलं आहे. तसेच शिवसेनेत हिंमत असेल तर त्यांनी मला हात लावून दाखवावं, असंही ते म्हणाले आहेत.