shital amte


चंद्रपूरच्या वरोरा येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शितल आमटे यांनी आत्महत्या केल्यानं महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. त्यांच्या आत्महत्येचं (sucide) कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र आत्महत्येपूर्वी आमटे कुटुंबातील वाद समोर आला होता.

काय होता हा वाद?

शितल आमटे या डॉ. विकास आमटे यांच्या कन्या होत्या. गौतम करजगी यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला होता. दि. २० नोव्हेंबर रोजी त्यांनी एक फेसबुक लाईव्ह केलं होतं. महारोगी सेवा समिती आणि त्यांच्या विश्वस्तांवर त्यांनी काही आरोप केले होते. कौस्तुभ आमटे, काका डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या कुटुंबीयांवरही काही आरोप (sucide) केले होते, त्यानंतर त्यांनी हे फेसबुक लाईव्ह (facebook live) डिलीट केलं होतं.


Must Read

1) कोल्हापुरात कडक बंदोबस्त,पोलिस सज्ज

2) जिल्ह्यात आज १९ रूग्णांची भर

3) मोठी बातमी : 'कोविडशील्ड' लशीमुळे गंभीर साइड-इफेक्ट; 5 कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी

4) डिसेंबर महिन्यात १४ दिवस बँका बंद राहणार

5) कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ कायम

6) हार्दिक पांड्याने मध्येच हा निर्णय घेऊन सर्वांना दिला आश्चर्याचा धक्का

शितल आमटे यांच्या आरोपांनंतर आमटे कुटुंबाने एक संयुक्त निवेदन काढलं होतं, ज्यामध्ये शितल यांचे आरोप फेटाळून लावण्यात आले होेते. या निवेदनावर शितल यांचे आई-वडील विकास आणि भारती तसेच चुलते प्रकाश आणि चुलती मंदाकिनी यांच्या सह्या होत्या.

शितल यांचं सर्व भाष्य हे तत्थ्यहीन असून कुणाचाही गैरसमज होऊ नये म्हणून आम्ही हे संयुक्त निवेदन जाहीर करत असल्याचं आमटे कुटुंबीयांनी म्हटलं होतं. शितल नैराश्याविरोधात लढत होत्या, असंही त्यांनी म्हटलं होतं.

शितल करणार होत्या निवेदन-

फेसबुक लाईव्हच्या (facebook live) माध्यमातून शितल यांनी आमटे कुटुंबावर आरोप केले होते. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी स्पष्टीकरणही दिलं होतं.'दिवंगत बाबा आमटे यांच्या कार्याला मी आणि माझे पती गौतम करजगी पुढे नेत आहोत. आम्ही एक निवेदन जारी करून लवकरच आमची भूमिका जाहीर करू. मी फेसबुक लाईव्ह करून माझी मतं मांडली होती तो व्हीडिओ मला डिलिट करण्यास भाग पाडलं, असं शितल यांनी सांगितलं होतं.