share market newsshare market- कोरोना संकटातही (coronavirus) यंदाची दिवाळी गुंतवणूकदारांसाठी चांगली दिसून आली. शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीचे नवे विक्रम होत आहेत. खरेदीचा ओघ वाढला असून परदेशी गुंतवणूकदारही हिंदुस्थानी शेअर बाजारात चांगली गुंतवणूक करत आहेत. नोव्हेंबर महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी 35190 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. (share market news)


Must Read

1) धोनीने संधी दिलेल्या फास्ट बॉलरची क्रिकेटमधून निवृत्ती

2) जयसिंगरावांनी पक्ष सोडला, पंकजा मुंडेंनी दिली महत्त्वाची प्रतिक्रिया

3) ...नाहीतर तुमचे सगळे धंदे बाहेर काढणार; निलेश राणेंचा भास्कर जाधवांना इशारा

4) RBI ची मोठी घोषणा!

5) पठ्ठ्याने खरोखरच किडनी विकून आयफोन घेतला


अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पेंद्र सरकारने 'आत्मनिर्भर भारत' मोहिमेंतर्गत 20 लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले. त्यानंतर भांडवली बाजार वधारला. 2 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर या बारा दिवसांत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 29436 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. ऑक्टोबरमध्ये गुंतवणुकीचा हा आकडा 22033 कोटी रुपये इतका होता.

हिंदुस्थानी कंपन्यांच्या शेअर्समध्ये जास्तीत जास्त परतावा मिळत असल्याने परदेशी गुंतवणूकदार आकर्षित झाले आहेत असे अर्थ विश्लेषक सांगतात. 

सेन्सेक्स 43,596

आज बाजार (share market)उघडताच सेन्सेक्सने (sensex) 400 अंकांची झेप घेतली आणि तो 44000 च्या स्तरावर गेला. निफ्टीनेही 12900 चा नवा विक्रमी स्तर गाठला. दिवाळीच्या सुट्टीनंतर शेअर बाजारात जोरदार खरेदी सुरू आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 81 अंकांनी वधारून 12801 अंकावर पोहोचला. संध्याकाळी बाजार बंद होताना सेन्सेक्स 43596 तर निफ्टी 12770 होता.