Ration Card


गेल्या काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टच्या (Supreme Court) निर्देशांनंतर राज्य सरकारांनी (State Government) सेक्स वर्कर्ससाठी (Sex Workers) रेशन कार्ड (Ration Card)बनवण्याचा निर्णय घेतला. आता पुन्हा एकदा रेशन कार्डबाबत नवा निर्णय घेण्यात आला आहे. आता केंद्र सरकारच्या सूचनेनुसार, काही राज्य सरकारांनी गंभीर रोगांनी ग्रस्त असलेल्या लोकांचंही रेशन कार्ड बनवण्याचं निर्णय घेतला आहे. 

देशातील काही राज्य सरकार गरीब कॅन्सरग्रस्त, कुष्ठरोग, आणि एड्स रुग्णांना आता मोफत धान्य देण्यात येणार आहे. झारखंड सरकारने याची अंमलबजावणीही सुरू केली आहे. सेक्स वर्कर्सनंतर आता गंभीर आजाराने पीडित असणाऱ्यांनाही मोफत धान्य दिलं जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

Must Read

1) खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर शरद पवारांचा पहिलाच दौरा रद्द

2) SBI मध्ये 2000 पदांसाठी भरती; डायरेक्ट लिंकने असा करा अर्ज

3) महाबळेश्वरमध्ये सुट्टी प्लॅन करताय ? मग हे वाचा

4) विधान परिषद निवडणूक ठरविणार महाविकास आघाडीचे भविष्य

5) ठाकरे सरकारच्या करणी आणि कथनीत फरक; प्रवीण दरेकरांची टीका

गंभीर रोगांनी ग्रस्त गरीब लोकांचं रेशन कार्ड  (Ration Card) बनणार -

झारखंडमध्ये गंभीर रोगाने ग्रस्त असलेले रुग्ण आता ऑफलाईन आणि ऑनलाईन रेशन कार्डसाठी अर्ज करू शकतात. झारखंड सरकारच्या सार्वजनिक वितरण आणि ग्राहक व्यवहार विभागाने याबाबत आदेश जारी केले आहेत. झारखंड सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर www.aahar.jharkhand.gov.in ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. त्यासोबतच राज्यातील जिल्हा पुरवठा कार्यालयं, पंचायत कार्यालयांमध्ये ऑफलाईन अर्ज करता येईल.

सुप्रीम कोर्टाने देशातील सर्व राज्य सरकारला, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदांतर्गत (National Food Security Act) सेक्स वर्कर्सला मोफत रेशन देण्याचे आदेश दिले आहेत. सेक्स वर्कर्सला अर्ज करण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला यासाठीचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत सेक्स वर्कर्सची ओळख आणि पत्ता गोपनीय ठेवला जाणार आहे.

रेशन कार्ड भारत सरकारकडून मान्यताप्राप्त सरकारी डॉक्यूमेंट आहे. रेशन कार्डच्या साहाय्याने सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) अंतर्गत धान्य, बाजारभावापेक्षा बऱ्याच कमी किंमतीत रेशन दुकानांतून धान्य खरेदी करता येतं. रेशन कार्ड बनवण्यासाठी आयडी प्रूफ म्हणून आधार कार्ड, सरकारी बँक खातं, वोटर आयडी कार्ड, पासपोर्ट, हेल्थ कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणताही आयडी प्रूफ वापरता येऊ शकतो.