sarkari-naukri-government-job-sbi

SBI PO Recruitment 2020 स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India, प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि योग्य उमेदवार यासाठी अधिकृत वेबसाईट sbi.co.in वर अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 डिसेंबर आहे. अ‍ॅप्लिकेशन प्रिंट करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2020 आहे.

एसबीआय ऑनलाईन प्रिलिमिनरी परीक्षा 31 डिसेंबर, 2, 4 आणि 5 जानेवारी, 2021 रोजी आयोजित करणार आहे. तर याच्या रिझल्टची घोषणा जानेवारी 2021 च्या तिसऱ्या आठवड्यात होईल. प्राथमिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षा देता येणार आहे. या रिक्रूटमेंट ड्राईव्हद्वारे 2 हजार पदांसाठी भरती केली जाणार आहे. एकूण 2 हजार व्हॅकेन्सीपैकी 810 सामान्य पदं, 540 ओबीसी, 200 ईडब्ल्यूएस आणि 150 पदं एसटी कॅटेगरीसाठी असणार आहेत.

Must Read

1) भाजपवर सदाभाऊ खोत नाराज, चंद्रकांत पाटलांसोबत झालेल्या बैठकीत काय ठरलं?
2) राहुल गांधींवर निशाणा साधल्याने काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्येच जुंपलं भांडण
3) दोन देशांसह पुण्यातून झाल्या 3 महत्त्वाच्या घोषणा
4) धोनी करणार असलेला 'कडकनाथ'चा व्यवसाय नेमका काय आहे?
5)केंद्र सरकार मुलींच्या खात्यामध्ये दरमहा 2500 रुपये भरणार?
6) CCTV VIDEO : भरदिवसा ज्वेलर्सच्या दुकानात बंदुकीसह घुसले चोर

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) -

उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून ग्रॅज्युएशन डिग्री असणं आवश्यक आहे. ज्या उमेदवारांचा शेवटच्या वर्षाचा रिझल्ट आलेला नाही, तेदेखील या पदासाठी अर्ज करू शकतात. परंतु इंटरव्ह्यूला त्यांना 31 डिसेंबर, 2020 पर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा पुरावा द्यावा लागेल.

 Application From Link 

अर्ज करण्यासाठी फी (Application Fees) -

सामान्य, EWS आणि ओबीसी कॅटेगरीतील उमेदवारांना 750 रुपये अ‍ॅप्लिकेशन फी भरावी लागेल. तर SC/ST/PWD प्रवर्गातील उमेदवारांना कोणतीही फी द्यावी लागणार नाही.