entertainment center


entertainment center- ‘मैने प्यार किया’ या ब्लॉकबस्टर चित्रपटातली अभिनेत्री भाग्यश्री आठवतेय का? तिचा मुलगा अभिमन्यू दासानी आणि सान्या मल्होत्रा लग्न करणार आहेत. पण हे खरंखुरं लग्न नाही तर चित्रपटातील लग्न असेल. ‘मिनाक्षी सुंदरेश्वर’ असं या चित्रपटाचं नाव असून यामध्ये अभिमन्यू आणि सान्या मुख्य भूमिका साकारत आहेत. हा रोमॅण्टिक कॉमेडी चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT platform) प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. विवेक सोनी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

आयुष्यातील विविध प्रश्नांना सामोरं जाणाऱ्या मदुराईतील एका तरुण जोडप्याची ही कथा आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला असून यामध्ये सान्या आणि अभिमन्यू वधू-वराच्या वेशभूषेत पाहायला मिळत आहेत. तामिळ वधूप्रमाणे सान्याने कांजीवरम साडी आणि त्यावर सोन्याचे दागिने परिधान केले आहेत. तर अभिमन्यूने वेष्टी आणि अंगवस्त्रम परिधान केले आहेत. या नवीन जोडीची कथा प्रेक्षकांना आवडेल का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (entertainment center)अनुराग बासूच्या ‘ल्युडो’ या चित्रपटानंतर सान्याचा हा दुसरा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT platform) येतोय. तर अभिमन्यूचा हा पहिलाच चित्रपट आहे, जो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतोय. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.