sushant singh rajputreal clear politics
- अभिनेता सुशांत सिंह राजपूतला (sushant singh rajput) मी बिहारचा मानत नाही. तो मुंबईचाच होता. बिहारमध्ये त्याला कोण ओळखत होतं?, असं वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. 'शट अप या कुणाल' या खास मुलाखतीत राऊत यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. 

'सुशांतला (sushant singh rajput) मी बिहारचा मानत नाही. तो मुंबईचा होता. बिहारमध्ये असताना त्याला कोण ओळखत होतं?, तो मुंबईत आला आणि त्याच्या कामाने त्याला ओळख मिळाली. मुंबई ही त्याची कर्मभूमी होती', असं राऊत म्हणाले. (real clear politics)

Must Read

1) राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या पाच हजारांहून कमी; बरे होण्याचे प्रमाण ९२.४८ टक्क्यांवर

2) भारताच्या चोख प्रत्युत्तरामुळे पाकिस्तान बिथरला; सीमेवर बेछूट गोळीबार सुरू

3) रोज सकाळी लिंबू पाणी पिण्याचे होतात ‘हे’ 9 जबरदस्त फायदे

4) ...म्हणून ट्विटरने काही काळासाठी हटविला अमित शहांचा डीपी

'सुशांतला न्याय मिळाला पाहिजे, हे ओरडणाऱ्यांपेक्षा आम्हाला जास्त वाटतं. ओरडून खोट्याचं खरं करता येत नसतं. सुशांतसोबत खरंच काही चुकीचं घडलं असेल तर आम्ही त्याला न्याय देऊ', असंही राऊत म्हणाले.

'कुणी कितीही ओरडलं तरी खोटं ते खोटं खोटं… न्याय देण्याच्या गोष्टी करणाऱ्यांनी हळू बोलावं पण खरं बोलावं, असा टोला राऊत यांनी रिपब्लिकचे संपादक अर्णव गोस्वामी यांना लगावला. तसंच विवेकानंदांचा शांततेचा विचार जगभर गेला, त्यामुळे शांत आणि खरं बोलण्याची भूमिका ठेवा, असा सल्लाही राऊत यांनी दिला.

'सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांनी तपास केला तोच तपास खरा आहे यावर शिक्कामोर्तब झालंय. मुंबई पोलिसांवर विश्वास ठेवला पाहिजे. देशाची सगळ्यात जास्त विश्वासार्ह मुंबई पोलिस फोर्स आहे. वर्दीवर विश्वास ठेवला पाहिजे, असंही राऊत यांनी नमूद केलं.

'अमुक व्यक्ती सरकारच्या विरोधात बोललं की कारवाई करा, असं मुंबई पोलिसांना सांगितलेलं नाही. कारण तो पोलिसांचा अधिकार आहे की कुणावर कारवाई करायची, कोणत्या वेळी अ‌ॅक्शन घ्यायची. मुख्यमंत्र्यावर, शरद पवारांवर, संजय राऊतांवर कुणी टीका केली म्हणजे त्यावर कारवाई करा, असं सरकारने पोलिसांना सांगितलेलं नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे', असंही सांगायला राऊत विसरले नाहीत.