samsung-galaxy-s21-galaxy-s21-plus

सॅमसंग (Samsung) Galaxy S21 सीरीजची माहिती लीक झाली आहे. यामध्ये या Galaxy S21 च्या सीरिजचे सर्व स्पेसिफिकेशन समोर आले आहेत. या सीरिजमध्ये सॅमसंग Galaxy S21  Galaxy S21 आणि सॅमसंग  Galaxy S21 Ultra या तीन फोनचा समावेश आहे. मॅक्स वेनबॅकने यासंदर्भात विस्तृत माहिती दिली आहे. वेनबॅकने केलेल्या दाव्यानुसार सॅमसंग Galaxy S21, Galaxy S21 आणि  Galaxy S21 Ultra ला  क्रमशः O1, T2 आणि P3 नाव देण्यात आलं आहे.  यामध्ये  Galaxy S21 Phantom Violet, Phantom Grey, Phantom White आणि  Phantom Pink रंगामध्ये येणार आहे.

सॅमसंग Galaxy S21 Phantom Silver, Phantom Black आणि  Phantom Violet रंगामध्ये येणार आहे. तर  Galaxy S21 Ultra हा Phantom Black आणि Phantom Silver या दोन रंगामध्ये येणार आहे.  वेनबॅकने केलेल्या दाव्यानुसार सॅमसंग Galaxy S21 मध्ये प्लॅस्टिक बॅक कव्हरचा वापर केला जाणार आहे. त्याचबरोबर  सॅमसंग Galaxy S21 सीरीजच्या सरफेसिंग रेंडर अतिशय परफेक्ट आहेत. त्याचबरोबर कॅमेरा बम्प आणि फ्रेम वेगवेगळ्या रंगाच्या तयार केल्या जाणार आहेत. Galaxy S21 वर फँटम व्हाईट तर Galaxy Note7वर ब्लू आणि  गोल्ड कलरसारखा ब्राँझ बेजलबरोबर निळा रंग असणार आहे.

Must Read

1) धोनीने संधी दिलेल्या फास्ट बॉलरची क्रिकेटमधून निवृत्ती

2) जयसिंगरावांनी पक्ष सोडला, पंकजा मुंडेंनी दिली महत्त्वाची प्रतिक्रिया

3) ...नाहीतर तुमचे सगळे धंदे बाहेर काढणार; निलेश राणेंचा भास्कर जाधवांना इशारा

4) RBI ची मोठी घोषणा!

5) पठ्ठ्याने खरोखरच किडनी विकून आयफोन घेतला

6) कतरिना कैफने सोशल मीडियावर शेअर केला बिकिनीमधला फोटो,


स्पेसिफिकेशन

सॅमसंग Galaxy S21 सीरीज 2 प्रोसेसर पर्यायांमध्ये मिळणार आहे. रिपोर्टमध्ये सांगितल्यानुसार, Qualcomm Snapdragon 875 chipset आणि Samsung Exynos 2100 chipsets या दोन्हीचा प्रोसेसरमध्ये वापर केला जाणार आहे. या चिप्स 5G ला सपोर्ट करणाऱ्या असून  सॅमसंग Galaxy S21 सीरीज 5G सपोर्टसह येणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी S21 अल्ट्रा वाय-फाय 6 ई ला सपोर्ट करणाऱ्या मालिकेतील एकमेव स्मार्टफोन असेल.

Galaxy S21 मध्ये असणार  4,000mAh बॅटरी

सॅमसंग Galaxy S21 मध्ये 4,000mAh ची बॅटरी असणार आहे. तर Galaxy S21मध्ये  4,800mAh ची बॅटरी असणार आहे. दुसरीकडे सॅमसंग Galaxy S21 Ultra मध्ये 5,000mAh ची बॅटरी असण्याची अपेक्षा आहे. रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही सॅमसंग Galaxy S21 स्मार्टफोनमध्ये 6.8 इंचांचा डिस्प्ले मिळणार आहे. Galaxy S21 ला 6.2-इंचाचा डिस्प्ले असणार असून Galaxy S21 ला 6.7-इंचाचा डिस्प्ले मिळणार आहे.

वेनबॅकच्या रिपोर्टनुसार  Galaxy S21 Ultra मध्ये सर्वांत उत्तम डिस्प्ले मिळणार आहे. Galaxy S21 Ultra मध्ये 6.8-इंचांचा WQHDLTPO डिस्प्ले मिळणार आहे. या स्मार्टफोनमध्ये पीक ब्राइटनेसचे 1,600 निट्स असणार आहेत.  Galaxy S21 Ultra देखील S Pen ला सपोर्ट करणार आहे. परंतु बॉक्समध्ये तो मिळणार नाही. सॅमसंग  Galaxy S21 आणि सॅमसंग Galaxy S21 मध्ये  Galaxy S20 सारखाच कॅमेरा आहे. यामध्ये  12-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 64-मेगापिक्सलची टेलिफोटो लेन्स आणि 12-मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेन्सचा समावेश आहे.

Galaxy S21 Ultraमध्ये 108 मेगापिक्सल सेन्सर, 12-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स सोबत मिळणार आहे. त्याचबरोबर यामध्ये दोन टेलिफोटो सेन्सरमध्ये एक 3X Telephoto आणि  एक 10X Super Telephoto लेन्स असेल.  वेनबॅकच्या रिपोर्टनुसार तिन्ही फोन  Galaxy S21 सीरीज अँड्रॉइड 11 आणि  वन UI 3.0 सिस्टीमवर चालणार आहेत. Galaxy S21 Ultra वर एका अल्ट्रा वाइड बँड चिपचादेखील वापर केला जाणार आहे.