ms dhonisports - भारताचा माजी कर्णधार एम.एस. धोनीची पत्नी साक्षी धोनीचा नुकताच ३२ वा वाढदिवस पार पडला. साक्षी धोनीनं आपल्या वाढदिवसाला अनेक खुलासे केले आहेत. सर्वात मोठा खुलासा धोनीबाबत आहे. ‘कॅप्टन कूल’ या नावानं प्रसिद्ध असलेला एम.एस धोनीलाही (ms dhoni) राग येतो. सोबतच साक्षीनं असेही सांगितलं की, धोनी आपला राग कुठे काढतो. चेन्नई सुपर किंग्जच्या अधिकृत संकेतस्थळावर साक्षी धोनीचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यामध्ये साक्षीनं अनेक खुलासे केले आहेत.

Must Read

1) महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकांबाबत मोठी बातमी

2) राज्यात Corona चे Active रुग्ण वाढले

3) सरकारने शाळा सुरू करण्याची घाई करू नये, भाजपच्या प्रवीण दरेकर यांची मागणी

4) धर्मासाठी सिनेसृष्टी सोडून मौलवीशी केला निकाह; सना खान

5) नगरसेवकाला दोरीने बांधून गटाराच्या पाण्यात बसवलं;

चेन्नई संघानं साक्षी धोनीचा व्हिडीओ आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये साक्षी म्हणते की, ‘मी अशी एकमेव व्यक्ती आहे जी धोनीला त्रास देऊ शकते.’ यासोबत साक्षीनं सांगितलं की, धोनी दुसरीकडील राग माझ्यावर काढतो. पण त्याचा मला काही त्रास होत नाही. यासोबत क्रिकेटबाबात (sports)धोनीसोबत कोणताही चर्चा होत नसल्याचं साक्षीनं या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.मुलगी झिवाबद्दल साक्षी म्हणते की, ती फक्त आपल्या वडिलांच एकते. त्यांच्याशिवाय झिवा कोणाचेही ऐकत नाही. मी आणि धोनीची (ms dhoni) आई तिला वारंवार खाण्यासाठी सांगतो मात्र ती ऐकत नाही. पण धोनीनं एकदा सांगितल्यानंतर ती लगेच जेवण करते.

धोनीच्या २००५-२००७ दरम्यान असलेल्या स्टाइलबद्दलही साक्षीनं या व्हिडीओत सांगितलं आहे. साक्षी म्हणते की, लांबसडक केसांमध्ये मी धोनीला पाहिलं नाही हे माझं सौभाग्य आहे. कारण, तसं मी त्याला पाहिलं असते तर कदाचीत त्याच्याकडे माझी नजरही गेली नसती. अशा पद्धतीची हेअर स्टाइल जॉन अब्राहमला सूट करते. धोनीला नाही.