Sadabhau khot


भाजपप्रणीत (BJP) आघाडीशी काडीमोड घेऊन पश्चिम महाराष्ट्रात स्वतंत्र राजकीय चूल उभारण्याची तयारी माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेच्या सदाभाऊ खोत (Sadabhau khot) यांनी केली आहे. 'गरज सरो अन् वैद्य मरो' या उक्तीचा अनुभव सदाभाऊ खोत यांना आला आहे. त्यामुळे ते वेगळी चूल मांडण्याच्या तयारी (politics)आहेत.

सदाभाऊ खोत (Sadabhau khot) यांची राजकीय उपयुक्तता संपुष्टात आल्याने भाजपने त्यांना जिल्ह्याच्याही राजकारणातून डावलण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप खोत यांच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. त्याचीच दखल घेतच सदाभाऊ खोत बंडाचं निशाण फडकावण्याच्या प्रयत्नात असल्याचं राजकीय निरीक्षकांकडून सांगितलं जात आहे.

Must Read

1) आता सोने खरेदी करताना व्हा स्मार्ट! नेमके कोणते अतिरिक्त दर लागतात घ्या जाणून

2) कारागृहाबाहेर नवनीत राणा यांचे धरणे आंदोलन

3) मंदिर खुली होणार असली तरी 'हे' नियम पाळावे लागणार!

4) बॉलिवूडच्या बाजीराव-मस्तानीच्या लग्नाला 2 वर्ष पूर्ण; पोस्ट शेअर

5) किरीट सोमय्या यांना मदत करायला तयार आहोत - आज्ञा नाईक

6) PHOTOS: रिंकू राजगुरूच्या नव्या फोटोंनी चाहत्यांना पाडली भुरळ

भाजपसाठी (BJP) सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला (Swabhimani Shetkar Sanghatana) रामराम ठोकला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी राज्य मंत्रिमंडळात स्थान दिलं होतं.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा माजी खासदार राजू शेट्टी  (raju shetti) यांनी 5 वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षाची युती तोडली होती. त्यानंतर मात्र, राजू शेट्टींचे राजकारण कमकुवत करण्यासाठी त्यांचे सहकारी सदाभाऊ खोत यांच्याशी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जवळीक साधली होती. एवढंच नाही तर त्यांचा पाठिंबा घेतला होता. नंतर सदाभाऊ यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान दिलं होतं. परंतु आता आता भाजपकडून त्यांना डावललं जात आहे.