runner-lalita-babar-appointed-tehsildar-charge

(Sport) जागतिक स्तरावर पीटी उषा आणि कविता राऊत यांचा वारसा पुढे नेण्याची क्षमता असलेल्या सातारा जिल्हयातील (Stara District) खेळाडू ललिता बाबर यांची प्रभारी तहसीलदारपदी नेमणुक करण्यात आली आहे. क्रीडा कोट्यातून त्यांनी रायगड जिल्हयातील माणगाव या ठिकाणी प्रभारी तहसीदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्या राष्ट्रीय विक्रमवीर आणि आशियातील सर्वोत्कृष्ट धावपटू आहेत.

सातारा जिल्ह्यातील माण परिसरात असलेल्या मोही या छोटयाशा खेडेगावात जन्मलेल्या ललिता बाबर शेतमजूर कुटुंबातील आहेत. जिल्हा स्तरावरील शालेय मैदानी स्पर्धांमध्ये मध्यम व लांब अंतराच्या शर्यतींमध्ये सातत्यपूर्ण यश मिळवले. त्यानंतर त्यांनी राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपल्या कौशल्याचा ठसा उमटवला.

Must Read

1) राष्ट्रवादीने 'त्या' बंडखोर नेत्याची केली पक्षातून हकालपट्टी

2) शेतकरी आंदोलकांवर दंगलीचे गुन्हे

3) 'भाजपमधून लवकरच ते नेते राष्ट्रवादीत येणार'

4) 1 डिसेंबरपासून विशेष ट्रेन्सच्या वेळापत्रकात बदल

5) अनैतिक संबंध तोडले म्हणून महिलेची अश्लील छायाचित्र मुलांना पाठवली

6) लग्न समारंभातून घरी जाताना तरुणांवर काळाचा घाला


फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्रीने (फिक्कीने) आणि भारताच्या युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाने 2015 सालचे क्रीडा पुरस्कार प्रदान करताना बाबर यांना स्पोर्ट्स पर्सन ऑफ दी ईयर असे म्हटले होते. त्यांना अर्जुन पुरस्कारही मिळाला आहे. शासनाने त्यांना यापूर्वीच सेवेत घेतलं आहे. सध्या त्यांचा परिविक्षाधीन कालावधी सुरू आहे