#RubinaDiliak and abhinaventertainment center-  छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच गाजलेला शो म्हणजे ‘बिग बॉस’. यंदा या शोचं १४ वं पर्व असून अगदी पहिल्या दिवसापासून हा कार्यक्रम चर्चेत आहे. आतापर्यंत या शोमध्ये अनेक वादग्रस्त घटना घडल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र, आता हा कार्यक्रम अभिनेत्री रुबिना दिलैक (#RubinaDiliak) आणि तिचा पती अभिनव शुक्ला (Big Boss 14) यांच्यामुळे चर्चेत आला आहे. अलिकडेच रुबिनाने तिच्या आणि अभिनवच्या नात्याविषयी एक धक्कादायक खुलासा केला आहे.

‘बिग बॉस १४’ (Big Boss 14)  पहिल्यांदाच एका पती-पत्नीच्या जोडीने सहभाग घेतला. त्यामुळे सध्या अभिनव आणि रुबिना (#RubinaDiliak) या जोडीची सोशल मीडियावर अनेकदा चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतं. बिग बॉसमध्ये सहभागी झालेली ही जोडी एकाच टीममध्ये होती.  (entertainment center)


Must Read

1) कोल्हापुरात कडक बंदोबस्त,पोलिस सज्ज

2) जिल्ह्यात आज १९ रूग्णांची भर

3) मोठी बातमी : 'कोविडशील्ड' लशीमुळे गंभीर साइड-इफेक्ट; 5 कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी

4) डिसेंबर महिन्यात १४ दिवस बँका बंद राहणार

5) कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ कायम

6) हार्दिक पांड्याने मध्येच हा निर्णय घेऊन सर्वांना दिला आश्चर्याचा धक्का

मात्र, अनेकदा त्यांच्यात खटके उडाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे ही जोडी कायमच चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली. त्यातच आता रुबिनाने अभिनवसोबतच्या नात्याविषयी धक्कादायक खुलासा केला असून बिग बॉसमध्ये येण्यापूर्वी ही जोडी घटस्फोट घेणार होती असं तिने सांगितलं.


‘बिग बॉस’च्या आगामी भागात घरातील स्पर्धकांना त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठं गुपित उघड करायचं आहे. यामध्येच रुबिना आणि अभिनवने बिग बॉसमध्ये येण्याचं कारण सांगितलं. त्याचबरोबर ते घटस्फोट घेणार असल्याचंही सांगितलं.

“एक वेळ अशी आली होती, जेव्हा मला अभिनवपासून घटस्फोट हवा होता. त्यामुळे आम्हाला नोव्हेंबरपर्यंत विचार करण्याचा कालावधी देण्यात आला होता. याचदरम्यान आम्हाला बिग बॉस १४ ची ऑफर आली. या शोच्या निमित्ताने आम्हाला एकमेकांसोबत वेळ घालवता येईल यासाठीच आम्ही या शोची ऑफर स्वीकारली”, असं रुबिनाने सांगितलं आणि तिला रडू कोसळलं. विशेष म्हणजे रुबिनाला रडताना पाहून अभिनवच्या डोळ्यांच्या कडादेखील पाणावल्या.

अभिनय आणि रुबिना ही जोडी बिग बॉसमध्ये सहभागी होण्यापूर्वीपासून त्यांच्या नात्याविषयी अनेक चर्चा रंगल्या होत्या. मात्र सध्या या दोघांमधील वाद मिटला असून त्यांनी त्यावर तोडगा काढल्याचं सांगण्यात येत आहे.