rohit pawarpolitics news of maharashtra- भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या टीकेकडे रोहित पवारांनी (rohit pawar) दुर्लक्ष केलं आहे. यावेळी त्यांनी आम्ही भाजपाचे (politics party of india)प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे दुर्लक्ष कर आहोत असं सांगत गोपीचंद पडळकर यांना टोला लगावला आहे. त्यांची योग्यता लोकांनी ठरवावी असंही यावेळी ते म्हणाले. ते कर्जतमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

“एकदा माझ्या मतदारसंघात येऊन त्यांनी तुम्ही म्हणताय तसंच बालिशपणाचं, कमी अभ्यास करुन वक्तव्य केलं होतं. त्याला मी उत्तर दिलं होतं. त्यानंतर पुन्हा त्यांनी असंच एक वक्तव्य केलं, ज्याकडे मी दुर्लक्ष केलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी इतकी वक्तव्यं केली. त्याच्यात कोण छोटा कोण छोटा हेदेखील त्यांनी सांगितलं. त्यांनी आपलं मन आणि जिगर दाखवून दिलं आहे. (politics news of maharashtra)

Must Read

1) कोल्हापुरात कडक बंदोबस्त,पोलिस सज्ज

2) जिल्ह्यात आज १९ रूग्णांची भर

3) मोठी बातमी : 'कोविडशील्ड' लशीमुळे गंभीर साइड-इफेक्ट; 5 कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी

4) डिसेंबर महिन्यात १४ दिवस बँका बंद राहणार

5) कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ कायम

6) हार्दिक पांड्याने मध्येच हा निर्णय घेऊन सर्वांना दिला आश्चर्याचा धक्का

त्यांच्याइतके मोठे नेते खालच्या पातळीवर येत असतील तर आम्ही मोठ्याच नेत्याला दुर्लक्ष करत असू तर अशी वक्तव्यं करुन मोकळे होतात त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. माझ्या कार्यकर्त्यांनीच मला हे सांगितलं आहे,” असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

“त्यांची योग्यता लोकांनी ठरवावी. एखादं वक्तव्य केल्यानंतर त्यानंतर त्यावर काय प्रतिक्रिया येतात त्याचा त्यांनी अभ्यास करावा. त्यावरुनच त्यांची योग्यता कळेल. याशिवाय जास्त काही बोलायचं नाही,” असंही ते म्हणाले.

रोहित पवार यांनी यावेळी उदयनराजेंनी मराठा आरक्षणावरुन केलेल्या टीकेलाही उत्तर दिलं आहे. “ते नेमकं काय बोलले हे मला माहिती नाही त्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करणार नाही. पण आज एकमेकांवर टीका करण्याची गरज नाही. एकत्र राहून आरक्षणाच्या बाबतीत मार्ग काढावा लागेल. कोणाला श्रेय घ्यायचं नाही. लाखो लोक गेली कित्येक वर्ष लढत आहेत त्यांना श्रेय जाणार आहे. लवकरात लवकर प्रश्न मार्ग लागेल असा विश्वास आहे,” असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.